धक्कादायक घटना ! पुण्यात आईच्याच प्रियकराकडून अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे

xr:d:DAFjVytz8Dg:8,j:5023806371,t:23051907

पिंपरी-चिंचवड – महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत लक्षणीय वाढ होत असल्याचे म्हटले जात असताना आता पिंपरी-चिंचवड येथे एका महिलेच्या प्रियकराने तिच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पंकज धोत्रे असे आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीची आई आणि आरोपीचे प्रेमसंबंध आहेत. रोजच्या प्रमाणे मुलीची आई कामावर निघून गेली. तिला एक भाऊ देखील आहे. मुलीचे वडील वेगळे राहतात. रक्षाबंधन दिवशी आरोपी पंकज धोत्रे पीडित मुलीच्या घरी आला. यावेळी मुलीची आई कामावर गेली होती. तर तिच्या भाऊ हा शाळेत गेला होता. घरी कुणी नसल्याचा फायदा आरोपी धोत्रेने घेतला. त्याने पीडित मुलीला जवळ घेत तिच्याशी जवळीक साधून अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. मात्र, मुलीने याला विरोध केला. त्यावेळी मुलीने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. यानंतर त्याने तिला सोडून दिले. या पूर्वी त्याने अनेकदा तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, पीडित मुलीने तिच्यासोबत घडलेला हा प्रकार तिच्या आईला सांगितला. मात्र, आईने या प्रकाराकडे दुर्लक्ष केले. उलट मुलीला तुला भास झाला असेल असे म्हटले. वर्षभरापूर्वीही आरोपी धोत्रेने असेच कृत्य केलं होतं. मात्र मुलीने आईला सांगूनही तिने तुला असा भास झाला असेल असे म्हणत दुर्लक्ष केले होते. या प्रकरणासंदर्भात आई पंकज धोत्रेचीच बाजू घेणार असं त्या मुलीला वाटलं, म्हणून मुलीने ही बाब तिच्या शाळेतील शिक्षिकेला सांगितली. पीडित मुलीवर झालेला अत्याचार ऐकून शाळेतील शिक्षक देखील हादरले. त्यांनी पोलिसांना सगळी हकीकत सांगितली. पंकज धोत्रे नेहमीचं त्या घरात ये जा करतो असा आरोप पीडित मुलीने फिर्यादीत केला आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपीला अटक केली आहे. आरोपीला शनिवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.