धक्कादायक घटना ! ३२ वर्षीय महिलेचे केस ओढले, तोंड दाबलं, चाकू लावत दोघांनी बंदखोलीत नेलं अन्…

राज्यात पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे.अशातच आणखीन एक धक्कादायक घटना मुंबईतून समोर आली आहे. ३२ वर्षीय महिलेवर दोघांनी बलात्कार केल्याची खळबळजनक घडना घडलीय.आपल्या मुलाला बोलवण्यासाठी गेलेल्या महिलेला दोन नराधमांनी पकडून नेत बंद खोलीमध्ये नेत अतिप्रंसग केला. नालासोपाऱ्यातील संतोष भवन येथे ही घटना घडली आहे.

10 सप्टेंबरला रात्री नऊ वाजता ३२ वर्षीय पीडित महिला आपल्या मुलाला बोलावण्यासाठी गेली. त्यावेळी आरोपी जितेंद्र यादव याने महिलेचे केस ओढले आणि तोंड दाबलं. गल्लीमधील एका रूममध्ये महिलेला नेलं. बंद खोलीमध्ये दुसरा आरोपी अवी जयस्वाल याने महिलेला चाकू दाखवत बलात्कार केला. दोन्ही आरोपींनी तिच्यावर अत्याचार केले. याबद्दल कोणालाही काही सांगितलं तर जीवे मारण्याचीही धमकी दोन्ही आरोपी नराधमांनी दिली. शेवटी शनिवारी पीडित महिलेने तुळींज पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपी विरोधात तक्रार देऊन गुन्हा दाखल केला आहे.

दोन्ही आरोपी सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यासाठी पथके तयार केली आहेत. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत. य घटनेने नालासोपाऱ्यामध्ये खळबळ उडाली आहे. पोलीस प्रशासनाचा आरोपींना काहीही धाक राहिलेला नाही. आरोपींचे पीडित महिलेसोबत भांडण झाल्याची माहिती समजत असून याबाबतही पोलीस तपास करत आहेत.