धक्कादायक! सप्तपदी सुरु असतानाचा नवरदेवाचा मृत्यू

सात जन्माची साथ अवघ्या सात सेकंदात संपली, आनंदाच्या वातावरणावर विरजण, यामुळे नवरदेवाचा मृत्यू

भोपाळ – नवरदेवाचा लग्नमंडपातच मृत्यू झाल्याची घटना मध्य प्रदेशमधील सागर येथे घडली आहे. लग्नादरम्यान वराच्या अचानक मृत्यूमुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे. मृत वराचे नाव हर्षित चौबे असल्याचे सांगण्यात येत आहे.

लग्नासाठी मोठ्या उत्साहात तयारी करण्यात आली होती. बँडबाजा, घोडागाडी अशा थाटात वरात काढण्यात आली होती. मध्यरात्रीपर्यंत नाच-गाणी आणि फोटोसेशन सुरू होते. सकाळी सहा वाजता सात फेरांचे विधी सुरू असतानाच हर्षित कोसळला. सात फेरे घेत असताना नवरदेवाला अचानक छातीत कळ आली आणि तो बेशुद्ध झाला. त्याला शुद्धीवर आणण्यासाठी कुटुंबियांनी आटापीटा केला, मात्र त्याचा उपयोग झाला नाही. नवरदेवाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केलं. हर्षितने त्याच्या शेजारी बसलेल्या त्याच्या वधूसोबत त्याचे दुःखही सांगितले होते. पण तिला वाटले की कदाचित थकव्यामुळे हे घडत असेल, पण काही मिनिटांतच हर्षित चौबे वधूच्या मांडीवर डोके ठेवून बेशुद्ध पडला. या घटनेमुळे लग्नासाठी आलेले लोक हर्षित चौबेकडे धावले आणि काही वेळातच हर्षित चौबेने शेवटचा श्वास घेतला. हर्षित फक्त २८ वर्षांचा होता.

हर्षित चौबे याच्यावर त्याच्या वडिलोपार्जित गावी जयसिंगनगर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. हर्षितचे गोपाळगंजमध्ये एक मेडिकल स्टोअर होते आणि त्याचे लग्न काही महिन्यांपूर्वीच ठरले होते. दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोक व्यक्त करण्यात येत आहे.