धक्कादायक !! भारतीय क्रिकेटपटूंसोबत खेळलेल्या क्रिकेटपटुची घरात घुसून हत्या

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाणसोबत खेळलेल्या एका खेळाडूची हत्या झालीय. धम्मिका निरोशना या खेळाडूच नाव आहे. मंगळवारी रात्री त्याची हत्या झाली. गुन्हेगारांनी घरात घुसून धम्मिका निरोशनाला पत्नी आणि मुलांसमोर गोळी झाडली.

धम्मिका निरोशना हा श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू आहे. धम्मिका निरोशना श्रीलंकेच्या अडंर-१९ टीमचा कॅप्टन होता. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत. धम्मिका निरोशना अंडर १९ च्या दिवसात इरफान पठाण, पार्थिव पटेल या भारतीय क्रिकेटपटूंसोबत खेळलाय. धम्मिका निरोशनाची हत्या कोणी केली? याचा श्रीलंकन पोलीस तपास करत आहेत. पोलिसांना अजूनपर्यंत गुन्ह्यामागचा उद्देश समजलेला नाही. धम्मिका निरोशनाची हत्या झाली, त्यावेळी घरात पत्नी आणि मुलं होती. धम्मिका निरोशना गॉलच्या अम्बालनगोडा येथे रहायचा.

धम्मिका निरोशना श्रीलंकेच्या अंडर १९ टीमकडून क्रिकेट खेळला. पण तो कधी श्रीलंकेच्या सिनियर संघात स्थान मिळवू शकला नाही. धम्मिका निरोशनेने श्रीलंकेच्या अंडर १९ टीममध्ये वर्ष २००० मध्ये डेब्यु केला. २ वर्ष तो श्रीलंकेच्या अडंर १९ टीमसाठी खेळला. या दरम्यान त्याने १० सामन्यात कर्णधारपद भूषवलं. एंजलो मॅथ्यूज, उपल थरंगा हे श्रीलंकेचे मोठे स्टार खेळाडू अंडर १९ च्या दिवसात धम्मिकाच्या कॅप्टनशिपमध्ये खेळले आहेत. धम्मिका निरोशनाने डिसेंबर २००४ मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.