हडपसरमधून शिवसेनेचे निष्ठावंत माजी आमदार महादेव बाबर यांनाच उमेदवारी ?

हडपसर,पुणे प्रतिनिधी – महाराष्ट्रात लवकरच विधानसभेचे बिगुल वाजत आहे, प्रत्येक इच्छुक उमेदवार तयारीला लागला आहे त्यातच माजी आमदार महादेव बाबर हे हडपसर विधानसभेमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून इच्छुक आहेत,त्यांनी आताच जोरदार तयारी देखील केली आहे, त्याच पार्श्वभूमीवर हडपसर येथील कन्यादान मंगल कार्यालयामध्ये निष्ठावंत शिवसैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता, हडपसर मधून महादेव बाबर यांनाच उमेदवारी मिळेल आणि आमदार म्हणून महादेव बाबर यांना निवडून आणण्याचा निर्धार शिवसैनिकांनी केलाय.

हडपसर विधानसभा मतदारसंघात माजी आमदार महादेव बाबर यांनी १०० टक्के दावा केला आहे, उद्धव ठाकरे यांच्याकडे हडपसर विधानसभेसाठी मातोश्रीवर अहवाल पाठवला आहे,हडपसरमधून डॉ अमोल कोल्हे यांना खासदारकिमध्ये मोठे लीड दिले असून माजी आमदार महादेव बाबर यांचा सिंहाचा वाटा आहे. तसेच शिवसेना संपवण्याची भाषा करणाऱ्या भाजपच्या माजी आमदाराला शिवसैनिकांनी निवडणुकीत जागा दाखवली, म्हणून विधान परिषदेत जावे लागतेय,हे दुर्दैव आहे,महादेव बाबर हेच हडपसर मधून आमदार होतील असा विश्वास शहरप्रमुख संजय मोरे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

हडपसर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे,मागच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा आमदार निवडून दिला पण त्यांनी पाच वर्षात हडपसर मध्ये काहीच विकासकामे केली नाहीत, विद्यमान आमदार काही विधानसभा भागात फिरकलेच नाहीत,असा लोकप्रतिनिधी मतदारांना नकोय,त्यामुळे हडपसर विधानसभा ही शिवसेना लढविणार व हडपसर विधानसभेवर भगवा फडकवणार असा विश्वास माजी आमदार महादेव बाबर यांनी व्यक्त केला. २०१९ मध्ये शिवसैनिकांच्या जीवावर आमदार झालेल्या विद्यमान आमदारांना निवडून आणण्यासाठी सिंहाचा वाटा शिवसैनिकांचा होता, हडपसर विधानसभेचे विद्यमान आमदारांनी एक रुपयांचे काम केलेले नाही, हडपसर मतदारसंघाला निधीग्रस्त घोषित करा अशी वल्गना केली,हडपसर विधानसभेतील मतदारांना मान खाली घालवण्याचे काम आमदारांनी केले असा आरोप उपशहर प्रमुख समीर तुपे यांनी केला ते माध्यमांशी बोलत होते.

यावेळी निष्ठावंत शिवसैनिकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पुणे शहर प्रमुख संजय मोरे, उपशहरप्रमुख समीर तुपे, अप्पा गायकवाड, माजी नगरसेवक विजय देशमुख, माजी नगरसेविका संगीता ठोसर, मेधा बाबर, प्राची आल्हाट, विभाग प्रमुख राजेंद्र बाबर, दत्ता खवळे, माजी नगरसेवक तानाजी लोणकर, भरत चौधरी, सचिन ननावरे, उपशहर संघटक नितीन गावडे, ऍड.के.टी.आरु, युवती सेना अधिकारी रेणुका साबळे, महेंद्र बनकर, विद्या होडे, सतीश कसबे, सतिश जगताप, प्रसाद बाबर, आदिसह पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.