खळबळजनक !मित्रानेच मित्राचा केला घात; एकाचवेळी नशेच्या आठ गोळ्या आणि गांजा देऊन केला खून, आरोपी फरार

एकाचवेळी नशेच्या आठ गोळ्या खाऊन आणि गांजा पिऊन मित्राचा खून केल्याची घटना विश्रांतीनगर भागात बुधवारी (दि.१६) सकाळी ११ वाजता घडली.

अमोल उर्फ नंदू संतोष दाभाडे (२१), असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर नीलेश सुभाष चव्हाण (१९), असे आरोपी तरुणाचे नाव आहे.घटना घडल्यानंतर इतर तरुणांनी जागेवरच आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र, चाकूचा धाक दाखवून तो पळून गेला.

चाकू हल्ल्याच्या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक कुंदन जाधव यांनी उपनिरीक्षक रेशीम कोळेकर, सहायक उपनिरीक्षक सुनील म्हस्के, अंमलदार विजय लकवाल, दीपक जाधव यांच्या पथकाला घटनास्थळी रवाना केले.त्यानंतर पुंडलिकनगर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. तो रेकॉर्डवरील आरोपी आहे. शहरात टवाळखोरांची भाईगिरी वाढल्याचे दिसत आहे. एकूणच शहरातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.