
प्रसिद्ध अभिनेत्याने या अभिनेत्रीला पाठवला अश्लील मेसेज, स्क्रीनशाॅट शेअर केलेली अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल

मुंबई – हिंदी चित्रपटसृष्टीप्रमाणेच मराठी चित्रपटसृष्टीतही कास्टिंग काऊचसारखा प्रकार समोर आला आहे. प्राची पिसाटने प्रसिद्ध सिने अभिनेते सुदेश म्हशीलकर यांच्या फेसबुक मेसेजचा स्क्रिनशॉर्ट शेअर करत प्राचीनं अनेक गंभीर आरोप केले आहेत.

‘तू चालं पुढे’ या झी मराठीच्या मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणून प्राची पिसाट ओळखली जाते. सुदेश यांनी प्राचीला फेसबुकवर, ‘तुझा नंबर पाठव ना… तुझ्याशी फ्लर्ट करायची इच्छा झालीये… कसली गोड दिसतेस’ असा मेसेज सुदेश यांनी प्राचीला केला आहे, असे त्या स्क्रीन शॉटमध्ये असं दिसून येत आहे. प्राचीने आपल्या इन्स्टा पोस्टमध्ये सुदेश म्हशीलकर यांच्या मेसेजचा एक स्क्रिनशॉर्ट शेअर केला आहे. त्यात तिने म्हटलं आहे की, ‘आणि मला हा स्क्रिनशॉट पोस्ट करायची इच्छा झाली… बायकोचा नंबर असलेच… ती ही गोड आहे… बघ जरा तिच्याशी फ्लर्ट करायला जमतंय का… ही पोस्ट डिलीट कर सांगायला कुठून तरीनंबर मिळवशील आणि कॉल करशीलच’ तसेच, प्राचीनं कॅप्शनमध्ये लिहिलंय की, ‘इच्छा नसेल माफी मागायची आणि तुम्हाला वेळ असेल तर बाकीच्या मुलींनी सांगितलेले तुमचे किस्सेही सांगू शकते…’ हे स्क्रीनशॉट्स वाऱ्यासारखे ऑनलाइन व्हायरल झाले आणि चाहत्यांकडून आणि मराठी फिल्म इंडस्ट्रीतील लोकांकडून यावर तीव्र प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. या आरोपांवर मात्र अद्याप सुदेश म्हशीलकर यांवी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. आता सुदेश यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील सगळ्याच पोस्ट काढल्या आहेत. तसेच प्राचीने मॅसेज केल्याचा दावा करुनही संपूर्ण प्रकारावर बोलणं टाळलं आहे.
https://www.instagram.com/p/DKFY3I4sgCD/?igsh=YnRzYnd4YXR5cDZh
सुदेश आजही कलाक्षेत्रात उत्तमोत्तम भूमिका साकारतात. ‘भाग्य दिले तू मला’ मालिकेत त्यांनी साकारलेली भूमिका विशेष गाजली. त्याचबरोबरीने स्टार प्रवाह वाहिनीवरील नवी मालिका ‘कोण होतीस तू काय झालीस तू’मध्ये ते श्रीकांत धर्माधिकारी ही भूमिका साकारत आहेत. याआधीही त्यांनी मराठी मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.









