साजिद खानने मला घरी भेटायला बोलावले आणि कपडे….

प्रसिद्ध अभिनेत्रीचा साजिद खसनवर कास्टिंग काऊचचा आरोप, म्हणाली महिलांचा अपमान…

मुंबईत – बाॅलीवूड आणि कास्टिंग काऊचचे होणारे आरोप हे समीकरण अलीकडे तयार झाले आहे. अनेक अभिनेत्रींनी अभिनेता, निर्माता किंवा दिग्दर्शकावर कास्टिंग काऊचचे आरोप केले आहे. आता या यादीत आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्रीची भर पडली आहे.

टीव्ही अभिनेत्री नवीना बोले हिने बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक साजिद खानवर गंभीर आरोप केला आहे. हा खुलासा वर्षापूर्वी घडलेल्या एका घटनेचा असला तरी या खुलाशामुळे बाॅलीवूडमध्ये खळबळ उडाली आहे. नवीना बोले या अभिनेत्रीने सुभोजित घोष यांच्या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. ती म्हणाली, “एक भयानक माणूस ज्याला मला आयुष्यात कधीच भेटायचे नाही. साजिद खान असे त्याचे नाव आहे. त्यांनी अनेक लोकांच्या मागे जाऊन महिलांचा अपमान करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. अरे बेबी दरम्यान मला घरी बोलावले. तेव्हा मी खूप उत्साही होते. मग तो मला म्हणाला की तू तुझे कपडे काढून अंतर्वस्त्रामध्ये का बसत नाहीस? तु किती इझी आहे हे मला पहायचे आहे. २००४ ते २००६ या कालावधीतली ही बाब आहे. मला ते आठवून अजूनही अंगावर काटा येतो.” असं नवीना बोलेने सांगितले. जर तुम्हाला मला बिकिनीमध्ये पहायचे असेल तर ठीक आहे. मी ते चित्रपटात घालेन. पण इथे मी कपडे काढून बसू शकत नाही, असे मी त्याला सांगितले. त्यानंतर त्याने मला ५० कॉल केले असावेत. मात्र, मी तेथून पळून जाण्यात यशस्वी झाले, असेही नवीनाने सांगितले. नवीना ही ‘इश्कबाज’, ‘मिले जब हम तुम’ या लोकप्रिय टीव्ही मालिकांमुळे प्रसिद्ध झालेली अभिनेत्री आहे.

साजिद खानवर असे आरोप करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापुर्वी बाॅलीवूडमध्ये झालेल्या Me Too चळवळीदरम्यान त्याच्यावर आरोप झाला होता. मात्र, या प्रकरणात त्यांची नंतर निर्दोष मुक्तता करण्यात आली.