
या खेळाडुकडे उपकर्णधार पदाची जबाबदारी, रोहित, विराटला बीसीसीआयचा इशारा, अनेक खेळाडूंना डच्चू, पहा अंतिम संघ

मुंबई – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने शनिवारी आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील मर्यादीत षटकांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. रोहित शर्मा आणि विराट कोहली ही जोडी पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी परतली आहे. पण याचवेळी एक मोठी घोषणा केली आहे.

कसोटी पाठोपाठ आता वनडे संघाच्या नेतृत्वाची जबाबदारीही आता शुबमन गिलच्या खांद्यावर देण्यात आली आहे. तर श्रेयस अय्यरला उप कर्णधार करण्यात आले आहे. टी-२० संघाचे नेतृत्व हे सूर्यकुमार यादवकडे कायम आहे. त्यामुळे रोहित शर्मा कर्णधारपदावरून पायउतार झाला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये आता रोहित शर्माऐवजी शुबमन गिल भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघेही ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेमध्ये पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान शुबमन गिलला टीम इंडियाचा उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले होते, त्यामुळे तो रोहित शर्माच्या जागी कर्णधारपदाची जबाबदारी घेऊ शकतो अशी चर्चा होती. पण आता ऑस्ट्रेलियाविरूद्ध वनडे मालिकेसाठी संघ जाहीर होताच यावर शिक्कामोर्तब झाला आहे. रोहित शर्मा सोबतच विराट कोहलीचीही वनडे संघात पुनरागमन झाले आहे. या दोघांनी शेवटचा सामना भारतासाठी २०२५ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळला होता. म्हणजे जवळपास ७ महिन्यांनंतर हे दोघे पुन्हा मैदानात दिसणार आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर भारत पहिल्यांदा वनडे मालिका खेळणार आहे. दरम्यान, भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात १९, २३ व २५ ऑक्टोबरला तीन वन डे सामने खेळवले जातील, तर पाच ट्वेंटी-२० सामन्यांची मालिकात २९ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर या कालावधीत खेळवली जाणार आहे.
वनडे मालिकेसाठीचा भारतीय संघ
शुभमन गिल- कर्णधार, श्रेयस अय्यर- उपकर्णधार, विराट कोहली, रोहित शर्मा, अक्षर पटेल, के.एल. राहुल नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव जुरेल, यशस्वी जैस्वाल.
ट्वेन्टी-20 मालिकेसाठीचा भारतीय संघ
सूर्यकुमार यादव- कर्णधार, अभिषेक शर्मा, शुभमन गिल- उपकर्णधार, तिलक वर्मा,नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीकरक्षक), वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, संजू सॅमसन, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर.









