‘या’ खेळाडूमुळे रोहित शर्माने कसोटीतून घेतली निवृत्ती

रोहित शर्माची शेवटची ती मागणी बीसीसीआयकडून अमान्य, त्या दोन दिवसात नेमकं काय घडलं?

मुंबई – भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. आयपीएल आपल्या अंतिम टप्प्यात आले असून भारत लवकरच इंग्लडचा दाैरा करणार आहे. त्यातच रोहित शर्माने निवृत्तीची घोषणा केल्यामुळे चाहत्यांना धक्का बसला आहे.

आंतरराष्ट्रीय टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेत असताना रोहित शर्माने आपल्या चाहत्यांसाठी एक भावनिक पोस्ट लिहिली. यात तो म्हणाला की, ‘सर्वांना नमस्कार, मी फक्त एवढेच सांगू इच्छितो की मी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत आहे. पांढऱ्या रंगात माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करणे हा एक महत्वाचा सन्मान राहिलाय.गेल्या काही वर्षांपासून मिळालेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद. मी वनडे क्रिकेट फॉरमॅटमध्ये टीम इंडियाकडून खेळत राहीन’. पण आता रोहितच्या निवृत्तीचे खरे कारण समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी रोहितने भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेसाठी सज्ज असल्याचे त्याने सांगितले होते. पण अचानक त्याने निवृत्ती जाहिर केली. एका इंग्रजी वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, इंग्लंड दौऱ्यापूर्वी निवडकर्त्यांनी रोहित शर्मासमोर कर्णधारपद सोडण्याचा प्रस्ताव ठेवला होता. रोहितला आणखी दोन सामन्यात संघाचे नेतृत्व करायचे होते पण निवडकर्त्यांनी त्याला नकार दिल्याने रोहित शर्मा याने निवृत्तीचा निर्णय घेतला. त्याचबरोबर रोहित आणि विराट यांचा फाॅर्म चांगला आहे तोपर्यंत ते भारतीय संघाचा भाग राहतील अन्यथा त्यांना देखील वगळले जाईल असे वक्तव्य रोहितने केले होते. त्यामुळे रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून संन्यास घेतला आहे. दरम्यान इंग्लंडमधील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारताला नवीन कसोटी कर्णधार मिळेल. यात जसप्रीत बुमराह, लोकेश राहुल, शुबमन गिल आणि ऋषभ पंत यांची नावे आघाडीवर आहेत, पण बुमराह सध्या उपकर्णधार असल्यामुळे त्याच्याकडे नेतृत्व सोपवले जाण्याची शक्यता आहे.

टीम इंडियाचा टेस्ट संघाचा कर्णधार असलेल्या रोहित शर्माची कारकीर्द अतिशय उत्तम ठरली. त्याने ६७ टेस्ट सामने खेळताना ४३०२ धावा केल्या. दरम्यान त्याने १८ अर्धशतकं, १२ शतकं तर १ द्विशतक सुद्धा लगावलं. या दरम्यान त्याने गोलंदाजी करताना २ विकेट सुद्धा घेतल्या आहेत. रोहित शर्मा एकदिवसीय आणि टी २० सारखा प्रभाव कसोटीत मात्र दाखवू शकला नाही.