अतिवृष्टीबाधित तालुक्यांची सुधारित यादी प्रसिद्ध

या तालुक्यातील शेतकऱ्यांनाच मिळणार सरकारी मदत, यादीत या तालुक्यांचा नव्याने समावेश, पहा तुमचा तालुका आहे का?

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टी आणि पूरबाधितांना मदत देण्याची घोषणा केल्यानंतर मदतीचे दर आणि निकषांचा शासन निर्णय गुरुवारी प्रसिद्ध केला. आता तालुक्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

राज्य सरकारने शुक्रवारी (ता.१०) सुधारित शासन निर्णय प्रसिद्ध करून २९ तालुक्यांचा नव्याने समावेश केला आहे. यामध्ये अंशत:बाधित आणि पूर्णत:बाधित असे वर्गीकरण राज्य सरकारने केले आहे. तसेच अंशत बाधित तालुक्यातील प्रत्यक्ष बाधित मंडळांना सवलती मिळणार असल्याचे राज्य सरकारने शासन निर्णयात स्पष्ट केले आहे. जमीन महसुलात सुट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती (एक वर्षासाठी), तिमाही वीज बिलात माफी, परीक्षा शुल्कात माफी व १० वी आणि १२ च्या विद्यार्थ्यांची फी माफी अशा सवलती मिळणार आहेत. दरम्यान कोरडवाहूसाठी ८ हजार ५०० रुपये, बागायतसाठी १७ हजार रुपये आणि बहुवार्षिक पिकांसाठी २२ हजार ५०० रुपये याप्रमाणे दोन ऐवजी आता तीन हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्यात येणार आहे. त्यामुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना शेतीपिकांच्या नुकसानीसाठी केवळ रब्बीसाठी प्रति हेक्टरी १० हजार रुपये वाढीव मदत मिळणार आहे.

अंशत बाधित तालुके कोणते?

नाशिक – कळवण, देवळा, इगतपुरी

धुळे- धुळे, साक्री, सिंदखेडा

अहिल्यानगर- पारनेर, संगमनेर, अकोले,

पुणे- हवेली, इंदापूर

सांगली- कडेगाव

सातारा- सातारा, कराड, पाटण, फलटण, जावळी

कोल्हापूर- कागल, शिरोळ, पन्हाळा

बुलढाणा- नांदुरा, संग्रामपूर

गोंदिया- तिरोडा, गोंदिया, गोरेगाव, मोरअर्जुनी, सालेकसा, सडक अर्जुनी, आमगाव

गडचिरोली- चारमोशी, कोरची

वरील तालुक्यांचा समावेश अंशत बाधित तालुक्यामध्ये आहे. या तालुक्यांमधील प्रत्यक्ष बाधित मंडळालाच सवलती देण्यात येणार आहेत, असे शासन निणर्यात स्पष्ट करण्यात आले आहे.

पूर्णत बाधित तालुके कोणते?

पालघर- पालघर, डहाणू, तलासरी, विक्रमगड

नाशिक- मालेगाव, निफाड, नांदगाव, सटाणा, दिंडोरी, सुरगाणा, नाशिक, त्र्यंबकेश्वर, पेठ, सिन्नर, चांदवड, येवला,

जळगाव- एरंडोल, पारोळा, धरणगाव, पाचोरा, जामनेर, जळगाव, भडगाव, अंमळनेर, रावेर, चाळीसगाव, भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर

अहिल्यानगर- अहिल्यानगर, शेवगाव, कर्जत, पाथर्डी, नेवासा, राहाता, श्रीरामपूर, जामखेड, राहुरी, श्रीगोंदा, कोपरगाव

सोलापूर- उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, अक्कलकोट, पंढरपूर, मोहोळ, मंगळवेढा, माळशिरस, माढा, करमाळा, सांगोला

सांगली – मिरज, वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव, कवठेमहाकाळ, विटा, आटपाडी, जत

सातारा- कोरेगाव, खटाव, माण

कोल्हापूर- करवीर, राधानगरी, गगनबावडा, आजरा, चंदगड

छत्रपती संभाजीनगर- छत्रपती संभाजीनगर, कन्नड, सोयगाव, पैठण, वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, सिल्लोड, फुलंब्री

जालना- बदनापूर, घनसावंगी, अंबड, जालना, परतूर, मंठा, भोकरदन, जाफराबाद

बीड- बीड, गेवराई, माजलगाव, केज, आंबेजोगाई, परळी, आष्टी, पाटोदा, शिरूर कासार, धारूर, वडवणी

लातूर- लातूर, औसा, रेणापूर, निलंगा, शिरूरअंनतपाळ, देवणी, उदगीर, जळकोट, अहमदपूर, चाकूर

धाराशिव- धाराशिव, कळंब, भूम, वाशी, तुळजापूर, लोहारा, परांडा, उमरगा

नांदेड- कंधार, किनवट, मुदखेड, भोकर, अर्धापूर, माहूर, नांदेड, लोहा, मुखेड, देगलूर, बिलोली, धर्माबाद, नायगाव, हदगाव, हिमायतनगर, उमरी

परभणी- पूर्णा, पालम, परभणी, सोनपेठ, जिंतूर, गंगाखेड, सेलू, मानवत, पाथरी

हिंगोली- हिंगोली, औंढा नागनाथ, कळमनुरी, सेनगाव, वसमत

बुलढाणा- नांदुरा, संग्रामपूर, चिखली, सिंदखेडराजा, देऊळगावराजा, लोणार, शेगाव, मोताळा, बुलढाणा, खामगाव, मेहकर, मलकापूर, जळगावजामोद

अमरावती- अमरावती, भातुकली, चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, धामणगाव रेल्वे, अचलपूर, अंजनगावसुर्जी, तिवसा, धारणी, चिखलदरा, वरुड, मोर्शी, चांदूरबाजार, दर्यापूर

अकोला- अकोट, अकोला, पातूर, तेल्हारा, मुर्तिजापूर, बाळापूर, बार्शिटाकळी

वाशिम- वाशिम, रिसोड, मालेगाव, मंगरुळपीर, कारंजा, मानोरा

यवतमाळ- पुसद, यवतमाळ, बाभुळगाव, मारेगाव, महागाव, उमरखेड, कळंब, घाटंजी, राळेगाव, दारव्हा, आर्णी, नेर, दिग्रस, पांढरकवडा, वणी, झरी-जामणी

वर्धा- वर्धा, सेलू, देवळी, आवी, समुद्रपूर, हिंगणघाट, कारंजा, आष्टी

नागपूर- नागपूर, कामठी, सावनेर, पारशिवनी, मौदा, भिवापूर, कळमेश्वर, काटोल, रामटेक, हिंगणा, उमरेड, कुही, नरखेड

भंडारा- साकोली, भंडारा, मोहाडी, तुमसर, पवनी, लाखनी, लाखांदूर

गोंदिया- देवरी

चंद्रपूर- चंद्रपूर, भद्रावती, राजुरा, बल्लारपूर, कोरपना, मूल, वरोरा, सावली, चिमूर, नागभिड, सिंदेवाही, पोंभुर्णा, जिवती, ब्रम्हपुरी

गडचिरोली – गडचिरोली, धानोरा, मुलचेरा, आरमोरी, कुरखेडा, अहेरी, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली, देसाईगंज (वडसा)