
अनेक इच्छुकांचा हिरमोड तर अनेकांना लॉटरी, पहा तुमच्या जिल्ह्यात कोण होणार अध्यक्ष?

मुंबई – महाराष्ट्रातील ३४ जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांचे आरक्षण आज जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्रात काही दिवसांत जिल्हा परिषद निवडणुका होणार असून, यासाठी सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. अध्यक्षपदाच्या आरक्षणाच्या चर्चेनंतर आज राज्याने जिल्हा परिषद अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर केले आहे.

जिल्हा परिषद अध्यक्षपदांचे आरक्षण: संपूर्ण यादी
ठाणे: सर्वसाधारण (Open) (महिला)
पालघर: अनुसूचित जमाती (ST)
रायगड: सर्वसाधारण
रत्नागिरी: नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) (महिला)
सिंधुदुर्ग: सर्वसाधारण
नाशिक: सर्वसाधारण
धुळे: नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
नंदुरबार: अनुसूचित जमाती
जळगाव: सर्वसाधारण
अहमदनगर: अनुसूचित जमाती (महिला)
पुणे: सर्वसाधारण
सातारा: नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
सांगली: सर्वसाधारण (महिला)
सोलापूर: नागरिकांचा मागास प्रवर्ग
कोल्हापूर: सर्वसाधारण (महिला)
छत्रपती संभाजीनगर: सर्वसाधारण
जालना: नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
बीड: अनुसूचित जाती (SC) (महिला)
हिंगोली: अनुसूचित जाती
नांदेड: नागरिकांचा मागास प्रवर्ग
धाराशिव: नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
लातूर: सर्वसाधारण (महिला)
अमरावती: सर्वसाधारण (महिला)
अकोला: अनुसूचित जमाती (महिला)
परभणी: अनुसूचित जाती
वाशिम: अनुसूचित जमाती (महिला)
बुलढाणा: सर्वसाधारण
यवतमाळ: सर्वसाधारण
नागपूर: नागरिकांचा मागास प्रवर्ग
वर्धा: अनुसूचित जाती
भंडारा: नागरिकांचा मागास प्रवर्ग
गोंदिया: सर्वसाधारण (महिला)
चंद्रपूर: अनुसूचित जाती (महिला)
गडचिरोली: सर्वसाधारण (महिला)









