
या अभिनेत्रीचे धक्कादायक विधान, ब्रेकअपनंतर केले मोठे खुलासे, म्हणाली तो…

चेन्नई – क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी निवृत्त जरी झाला असला तरीही तो नेहमीच चर्चेत असतो. धोनी प्रसिद्ध झाल्यानंतर दाक्षिणात्य अभिनेत्री राय लक्ष्मीसोबतच्या अफेअरबद्दल बरीच चर्चा झाली होती. राय लक्ष्मीने एमएस धोनीसोबतच्या तिच्या नात्याबद्दल मोठा खुलासा केला आहे.


२००८ ते २००९ दरम्यान राय लक्ष्मी आणि एमएस धोनी यांच्यातील नात्याची बातमी खूप चर्चेत होती. २००९ मध्ये आयपीएलच्या पार्टीमध्ये दोघेही एकत्र दिसले होते. धोनी लक्ष्मीच्या वाढदिवसाच्या पार्टीलाही उपस्थित होता तेंव्हा याची खुपच चर्चा झाली होती. राय लक्ष्मीने स्वतःच याबद्दल खुलासा केला होता. तिच्या आणि धोनीच्या नात्याविषयी फार कोणाला माहित नसल्याचेही तिने म्हटले होते. धोनीसोबतच्या नात्याविषयी राय लक्ष्मीने भाष्य केलेलं आहे. धोनीसोबतचं नातं हे माझ्या आयुष्यातील एखाद्या जखमेसारखं आहे, असं ती म्हणाली होती. ‘माझं धोनीसोबतचं नातं हे एखाद्या डागाप्रमाणे किंवा जखमेच्या निशाणाप्रमाणे आहे. ही खून बराच काळ कायम राहणार आहे, असं मी गृहित धरलेलं आहे,’ अशी प्रतिक्रिया तिने दिली आहे. एमएस धोनी आणि राय लक्ष्मी यांच्यात त्यांच्या करिअरमुळे अंतर होतं. यामुळे ते वेगळे झाले. राय लक्ष्मीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर एका वर्षानंतर, एमएस धोनीने साक्षी धोनीशी लग्न केलं. हे जोडपं आता आनंदी वैवाहिक जीवन जगत आहे. त्यांना एक मुलगी देखील आहे.

लक्ष्मी ही दाक्षिणात्त्य अभिनेत्री आहे. तिने सिनेक्षेत्रात २००५ साली कारका कसाद्रा या तमिळ चित्रपटाच्या माध्यमातून पदार्पण केले होते. अजय देवगणसोबत तिने भोला या चित्रपटातही काम केले आहे. अकिरा या चित्रपटातही ती दिसली होती.










