RBI चा मोठा निर्णय…! होम-कार लोन आणखी स्वस्त होणार, रेपो रेटमध्ये कपात

भारतीय रिझर्व्ह बँकेने देशातील कोट्यवधी नागरिकांना पुन्हा एकदा मोठा आर्थिक दिलासा देणारी घोषणा केली आहे. होम आणि कार लोन आणखी स्वस्त होणार आहे. आरबीआयने रेपो रेटमध्ये कपात करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी चलनविषयक धोरण समितीची तीन दिवसीय बैठकीत घेतलेल्या निर्णयांची शुक्रवारी (5 डिसेंबर) घोषणा केली.

RBI च्या चलनविषयक धोरण समितीची तीन दिवसांची बैठक बुधवारी सुरू झाली होती. RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची घोषणा केली. भारतीय रिझर्व्ह बँकेने देशातील कोट्यवधी नागरिकांना पुन्हा एकदा मोठा आर्थिक दिलासा दिला आहे. RBI ने रेपो दरात 0.25% (पॉइंट 25 टक्के) कपात करण्याची घोषणा केली आहे. आता रेपो दर 5.25 टक्क्यांवर खाली आला आहे.

दरम्यान, महागाईमध्ये घट झाल्यानंतर RBI ने गेल्या फेब्रुवारीपासून रेपो दरात तीन टप्प्यांमध्ये मिळून एकूण 1 टक्का कपात केली आहे. यापूर्वी रेपो दर 5.5 टक्के (साडेपाच टक्के) स्थिर ठेवण्यात आला होता. ऑक्टोबरमध्ये किरकोळ महागाईचा दर 0.25 टक्के हा गेल्या एका दशकातील सर्वात कमी पातळीवर होता आणि घाऊक मूल्यांमध्ये 1.21 टक्के घट नोंदवली गेली होती.

RBI च्या या निर्णयामुळे सामान्य नागरिकांना थेट फायदा होणार आहे. ईएमआय होणार आहे. होम लोन, कार लोन आणि इतर सर्व प्रकारच्या कर्जांचे मासिक हप्ते आणखी कमी होतील, असे बोललं जात आहे. त्याचबरोबर ईएमआय कमी झाल्यामुळे लोकांच्या पैशाची बचत होईल. परिणामी बाजारात खरेदी वाढेल. बाजारात (मार्केटमध्ये) खरेदी वाढण्यास मदत होईल. वाढलेली खरेदी भारतीय अर्थव्यवस्थेची गती वाढवण्याचे काम करेल. रेपो रेटमध्ये कपात करण्यात आली आहे. त्यामुळे कर्ज स्वस्त होणार असले तरी, या निर्णयाचा एक परिणाम म्हणून बँक एफडीवर मिळणारे व्याज दरात घट होण्याची शक्यता आहे.