पुणे महानगरपालिकेच्या वतीने परिसर सुशोभिकरण आणि वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन

मांजरी पुणे : पुणे महानगर पालिका महादेव नगर आरोग्य कोठी, पुणे महानगरपालिका आरोग्य विभाग, राजश्री शाहू महाराज हेल्थ फोंडेशन,मिशन सुपर ५० ग्रुप ,आणि जनवानी संस्था, स्वच्छ संस्था, यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छ्ता अभियान, परिसर सुशोभिकरण आणि वृक्षारोपण या कार्यक्रमाचे आयोजन आज मांजरी फार्म येथे करण्यात आले होते, घनकचरा व्यवस्थापन उपआयुक्त संदीप कदम, परिमंडळ क्र 4 उपआयुक्त संजय भोसेकर, हडपसर क्षेत्रीय कार्यालय सहाय्यक आयुक्त बाळासाहेब ढवळे पाटील व वरिष्ठ आरोग्य निरीक्षक श्रीपाद नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली या अभियानाचे आयोजन करण्यात आले

मांजरी फार्म मोरे वस्ती रोड येथे रोजच कचऱ्याचे ढीग पाहायला मिळत होते, दर आठवड्याला पुणे महानगरपालिका कर्मचारी कचरा उचलून नेत होते, दुर्गंधी पसरली होती, परीसरातील नागरिकांनी उघड्यावर कचरा टाकू नये परिसरात कचरा संकलनाचे काम करीत असणाऱ्या स्वच्छ संस्थेच्या सेवकांना वर्गीकृत कचरा देणेबाबत जनजागृती केली. स्वच्छता अभियान तसेच कचरा टाकतात त्याठिकाणी वृक्षारोपण करून एक अआगळा वेगळा उपक्रम केला आहे. जुन्या जीन्स पॅन्ट, टाकाऊ लाकडी साहित्य, जुने टायर्स, फुलांची झाडे यांचा वापर करून परिसर सुदंर बनविण्यात आला.

यावेळी आदर पूनावाला क्लीन सिटी एनेसिटीव्ह, पुणे महानगरपालिका, हडपसर क्षेत्रीय कार्यालय आरोग्य विभाग, महादेव नगर आरोग्य कोठी, आरोग्य निरीक्षक नितिन कांबळे,मुकादम नितिन गायकवाड, ब्रँड ॲम्बेसेडर सूरज गायकवाड व सफाई कर्मचारी आणि जनवानी संस्था, इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ एअरक्राफ्ट इंजीनियरिंग, मिशन सुपर 50 ग्रुप,स्थानिक नागरिक, सतिश आदमाने,अरुण झांबरे, मधुकर कवडे, कुलदीप यादव,परेश जमदाडे वैजनाथ भगत, किरण बहिरट यांनी सहभाग घेतला. यावेळी सफाई सेवक महिलांनी कचरा टाकण्यासंदर्भात जनजागृती केली आहे,नागरिकांनी कचरा कुंडीतच टाकावा,इतर ठिकाणी टाकू नये, आपला परिसर स्वच्छ ठेवावा असे आवाहन करण्यात आले