
प्रकल्प सर्वेक्षणास २१ लाख रुपये मंजूर, सभापती प्रा.राम शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश

मुंबई – विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या पुढाकारातून श्री क्षेत्र चौंडी येथे ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’च्या धर्तीवर साकारल्या जाणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय स्मारकाच्या जलद विकासासाठी फडणवीस सरकारकडून वेगाने पाऊले उचलली जात आहेत. त्याचाच भाग म्हणून सरकारने चौंडीच्या सिना नदीवर २ बुडीत बंधारे बांधण्यास मंजुरी दिली आहे. यासाठी १५० कोटी खर्च अपेक्षित असून पहिल्या टप्प्यात ५० कोटींची तरतूद करण्यात आली असून या प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी सरकारने २१ लाख रूपये मंजूर केले आहेत. या बंधाऱ्यांमुळे सिंचन, पाणीपुरवठा, नदीपात्राचे सौंदर्यवर्धन आणि पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी वर्षानिमित्त श्री क्षेत्र चौंडी (ता. जामखेड) येथे 6 मे 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक पार पडली होती. या बैठकीत विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांच्या पुढाकारातून तयार करण्यात आलेल्या ‘श्री क्षेत्र चौंडी बृहत विकास आराखड्यास’ सरकारने मंजुरी दिली होती. या आराखड्यासाठी 681 कोटी 32 लाख रूपये खर्चाच्या मान्यता देत शासन निर्णय जारी करण्यात आला होता. त्यानंतर पावसाळी अधिवेशनात चौंडीला जोडणाऱ्या रस्त्यांच्या कामांसाठी सरकारने 360 कोटींचा निधी मंजुर केला होता आता चौंडी येथील सिना नदीवर 2 बुडीत बांधण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. जलसंपदा विभागाने सिना नदीवरील दोन बुडीत बंधारे बांधणीसाठी यासाठी 150 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. जलसंपदा विभागाने सिना नदीवरील दोन बुडीत बंधारे बांधणीसाठी 50 कोटी रुपयांची तरतूद करत प्रकल्पाचे सविस्तर सर्वेक्षण करण्यास प्रशासकीय मान्यता दिली आहे. या सर्वेक्षणासाठी रु. 21.13 लाख खर्च मंजूर करण्यात आला आहे, हे काम महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळामार्फत केले जाणार आहे. या कामामुळे नदीपात्राचे सौंदर्यवर्धन होणार आहे. तसेच नदीत पाणीसाठा वाढून परिसराला दीर्घकालीन सिंचन व पाणीपुरवठ्याचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे.
श्री क्षेत्र चौंडी बृहद विकास आराखड्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मस्थळाचे सुशोभीकरण, नदीत भव्य पुतळा, चौंडी येथे देशभरातून येणाऱ्या पर्यटकांसाठी सुव्यवस्थित रस्ते, संग्रहालय, महादेव मंदिर आणि चौंडीश्वरी मंदिर जीर्णोध्दार, निवास व्यवस्था, सुसज्ज वाहनतळ, स्थानिक उत्पादने व खाद्यपदार्थ यांची बाजारपेठ, चौंडी परिसरातील ऐतिहासिक, पौराणिक स्मृतीस्थळांचे जतन, पायाभूत सुविधा उभारणी, सिना नदी सुशोभीकरण व शुद्धीकरण, तसेच दोन बुडीत बंधारे बांधणीचा समावेश आहे.









