या लोकप्रिय अभिनेत्रीचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक?

अभिनेत्री संतापली, पोस्ट करत सुनावले, म्हणाली तुम्हाला हे व्हिडिओ पाहायचे असतील, तर…

चेन्नई – तमिळ अभिनेत्री श्रुती नारायणनचा कास्टिंग काउच व्हिडिओ लीक झाल्याची बातमी समोर आल्यानंतर तिच्या चाहत्यांना धक्का बसला. यामुळे चित्रपटसृष्टीत एकच खळबळ उडाली होती. पण आता त्याबाबत वेगळीच माहिती समोर आली आहे.

दक्षिणेतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असलेल्या श्रुती नारायणन हिचा तब्बल १४ मिनिटांचा प्रायव्हेट व्हिडीओ सध्या इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. ‘सिरागदिक्का आसाई’ या मालिकेतील भूमिकेमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या श्रुतीचे वैयक्तिक आयुष्यातील खाजगी क्षण सार्वजनिक झाले. हा व्हिडीओ कथितरित्या ऑडिशनदरम्यान चित्रीत झाल्याचं म्हटलं जात आहे, मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. व्हिडीओ सुरुवातीला Reddit या प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला, त्यानंतर X (Twitter), Instagram आणि Telegram यांसारख्या सोशल मीडियावर तो झपाट्याने व्हायरल झाला. या प्रकारामुळे चाहत्यांमध्ये आणि इंडस्ट्रीत खळबळ माजली आहे. अनेकांनी कास्टिंग काउचशी संबंधित प्रकरण असल्याचा संशय व्यक्त केला आहे. सध्या नेटकऱ्यांकडून याबाबत संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत. घटनेनंतर अभिनेत्री श्रुती नारायणनने तिचं अधिकृत Instagram अकाउंट प्रायव्हेट केलं आहे. एआयच्या मदतीनं आज व्हिडीओ बनवणं किती सोपं आहे असं म्हणतं तिनं या सगळ्याचा त्रास होत असल्याचं सांगितलं एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिनं लिहिलं आहे की ‘तुमच्यासाठी माझ्याविषयीचे हे सगळे कंटेन्ट पसरवणं एक विनोद आहे आणि मस्करी वाटू शकते. पण माझ्या आणि माझ्या जवळच्या लोकांसाठी हे खूप कठीण आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्यासाठी हा सगळ्यात कठीण काळ आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सकडून हा व्हिडीओ हटवण्याचे प्रयत्न सुरू असून, अभिनेत्रीच्या खाजगी आयुष्याचा आदर राखण्याचं आवाहन अनेकांनी केलं आहे. हा व्हिडीओ एआयच्या मदतीनं बनवण्यात आला आहे. तर तिनं अशा प्रकारचे व्हिडीओ शेअर करण्यांवर निशाणा साधला आहे.

https://www.instagram.com/reel/DHf-ktWoFW6/?igsh=MWFmOHI0YmNxN25kNQ==

सध्या या प्रकाराची चौकशी पोलीस करत आहेत. मात्र, २६ मार्च २०२५ पर्यंत या प्रकरणी ना श्रुतीकडून ना चित्रपट संस्थेकडून कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. श्रुती नारायणन ही २४ वर्षांची अभिनेत्री आहे. ती चेन्नईची असून तिनं तमिळ मालिकांमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते.