रस्त्यावर खड्डा ? व्हॉट्सअ‍ॅपद्वारे करा तक्रार, २४ तासांत दुरुस्ती, खड्ड्यांवर पुणे पोलिसांनी नजर

 (प्रतिनिधी – प्रियंका बनसोडे) – पावसाने उघडीप घेताच महापालिकेच्या पथ विभागाकडून शहरातील रस्ते दुरुस्ती वेगाने सुरू करण्यात आली आहे. त्यात मागील तीन दिवसांत महापालिकेकडून तब्बल १२२४ खड्डे दुरुस्त करण्यात आले आहेत. रस्त्यांवरील खड्ड्यांची माहिती महापालिकेस कळविण्यासाठी पथ विभागाकडून हेल्पलाइन देखील सुरू करण्यात आली असून, नागरिकांना आता व्हाॅटसअपवर रस्त्यावरील खड्डयांच्या फोटोंसह तक्रार करता येणार आहे.

पावसामुळे पुणे शहरातील विविध डांबरी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते, तसेच दोन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधीमध्ये पावसाने अजिबातच विश्रांती घेतली नसल्याने, रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम करणे अडचणीचे होत होते. शनिवारी रात्री पाऊस न पडल्याने पथ विभागाने पडलेले खड्डे बुजविण्यासाठी मोहीम हाती घेतली होती. त्याचप्रमाणे रविवारी रात्री आणि सोमवारी रात्रीही पाऊस नसल्याने सदरची मोहीम चालू ठेवण्यात आली. पथ विभागाकडून रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि त्यावर करावयाचे पॅचवर्क या दोन्ही कामांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

मुख्यताः काँक्रिटच्या (सिमेंट) माध्यमातून खड्डे बुविवण्यात आले आहेत, तसेच पॅचवर्कसाठी देखील काँक्रिट वापरण्यात आले आहे. अनेक खड्डे व पॅचवर्क हे डांबरी मालाच्या मदतीने बुजविण्यात आले, तर ज्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत, तो पूर्ण रस्ताच रिसर्फेसिंग केला जाणार आहे. एकूण बुजविण्यात आलेले खड्डे -१२२४ ,पॅचवर्क करण्यात आलेले खड्डे – १५३ ,वापरण्यात आलेला काँक्रिट माल- ३६३ क्युबिक मीटर ,वापरण्यात आलेला डांबरी माल- २५६ मेट्रिक टन . नागरिकांकडून खड्डयांसंदर्भात माहिती पथ विभागाला कळविण्यात आल्यानंतर त्यावर योग्य कार्यवाही तात्काळ करण्यात यावी, याकरीता पुणे महानगरपालिका पथ विभागामार्फत दुरध्वनी क्र. ०२०-२५५०१०८३ व मो.नं.९०४३२७१००३ (WhatsApp) या हेल्पलाईन क्रमांकवर नागरिकांनी संपर्क क्रमाक जाहीर करण्यात आले आहेत.