बार्शी प्रतिनिधी – बार्शी तालुक्यातील येडेश्वरी साखर कारखान्यास २०२२ ते २०२३ च्या गळीत हंगामात ऊसतोड कामगार व ट्रॅक्टर ट्रॉली आणि मजूर टोळी भाड्याने देऊन ठरलेल्या दराने १० लाख 3० हजार ६०८ रुपये देण्याचे टाळ्याप्रकरणी न्यायालयात खासगी फिर्याद दाखल झाली होती. न्या. जी. एस. पाटील यांनी कारखान्याविरुद्ध पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी संतोष शिंदे व इतर शेतकऱ्यांच्या वतीने अँड. आर. यू. वैदय अँड. के.पी. राऊत आणि अँड. एस. ‘पी.शहा यांनी काम’ पहिले न्यायालयाने दिलेल्या आदेशात या. कारखान्याविरुद्ध सीआरपीसी कलम १५६: ३ प्रमाणे पांगरी पोलिसात गुन्हा दाखल करून ६० दिवसांत अहवाल न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत बार्शी तालुक्यातील बाभुळगाव येथील संतोष रामचंद्र शिंदे यांनी वाहतूक खर्च व त्यावरील ४० टक्के कमिशन ठरल्याप्रमाणे ही रक्कम मिळाली नसल्याने ऊसतोड करणारे व मजूर पुरवठा करणाऱ्या १४ जणांच्या टोळी प्रमुखाच्या वतीने प्रथम पांगरी पोलिसात व पोलिस अधीक्षक सोलापूर यांच्याकडे तक्रार केली होती. त्याची पोलिस खात्याने दखल घेतली नाही. म्हणून संतोष शिंदे यांनी सर्वाच्या वतीने बार्शीच्या प्रथम वर्ग न्यायालयात कारखान्याचे चेअरमन व संचालक यांच्याविरुद्ध सर्वांचे १० लाख ३० हजार ६०८ रुपये दिले नाहीत म्हणून भादंवि ४२० व ३४ प्रमाणे खासगी फिर्याद दाखल करताच न्यायालयाने वरील आदेश दिला. यामध्ये संतोष रामचंद्र शिंदे, अजित कल्याण शिंदे, विष्णू ज्ञानदेव शिंदे, ज्योतीराम भगवान लोंढे, संतोष बबन शिंदे, विशाल वैजिनाथ शिंदे, सुरज सिद्धेश्वर शिंदे, दत्तात्रय नंदकुमार शिंदे, स्वप्नील गुलाब शिंदे, विजय बाळनाथ शिंदे, बाबासाहेब मोहन शिंदे, धर्मराज गोरख साळुंखे , अमित गोपीनाथ निकम यांनी तक्रार केली होती. कारखान्याविरुद्ध सीआरपीसी कलम १५६: ३ प्रमाणे पांगरी पोलिसात गुन्हा दाखल करून ६० दिवसांत अहवाल न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिले आहेत. पुढे काय कारवाई होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे