विराट कोहली सध्या लंडनमध्ये आहे. टी२० वर्ल्ड कप विजयाच सेलिब्रेशन झाल्यानंतर तो तडक लंडनला निघून गेला. कारण पत्नी अनुष्का आणि मुलं सध्या लंडनमध्ये आहेत. इथे भारतात विराटच्या रेस्टॉरंट विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
देशातील अनेक शहरात ‘वन८ कम्युन’नावाने विराट कोहलीच्या रेस्टॉरंट आणि पबची चेन आहे. बंगळुरु आणि मुंबई शिवाय मागच्यावर्षी विराटने गुरुग्राम येथे याच नावाने एक रेस्टॉरंट सुरु केलय
हे प्रकरण बंगळुरुमधील विराट कोहलीच्या ‘वन८ कम्युन’ रेस्टॉरंटशी संबंधित आहे. बंगळुरु पोलिसांनी हा गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी कारवाई का केली? हा प्रश्न आहे. बंगळुरु पोलिसांनी एमजी रोड वरील रेस्टॉरंट विरोधात गुन्हा का नोंदवला? याचा संबंध रात्री उशिरा सुरु असलेल्या एका गोष्टीशी आहे. त्यामुळे नाईलाजाने पोलिसांनी कारवाईच पाऊल उचलाव लागलं. शहराच्या डीसीपी सेंट्रलने विराट कोहलीच्या बंगळुरु येथील रेस्टॉरंट विरोधात कारवाई केल्याची माहिती दिली.
डीसीपी सेंट्रलने एएनआय शी बोलताना सांगितलं की, “त्यांनी बंगळुरुच्या ३-४ पब विरोधात गुन्हा नोंदवलाय. रात्री उशिरा १.३० वाजेपर्यंत हे पब सुरु असतात अशी माहिती मिळालेली. रात्री उशिरा मोठ्या आवाजात म्युझिक सिस्टिम सुरु असल्याची तक्रार मिळाली होती. नियमानुसार, शहरातील पब्सना रात्री १ वाजेपर्यंतची परवानगी आहे”
.