पुणे पोलीस दलात मागील काही महिन्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि पोलीस निरीक्षकांच्या सातत्याने बदल्या होत आहेत. पोलीस स्टेशनचा पदभार स्विकारुन एक -दोन महिने होत नाहीत तोच त्यांची बदली होत आहे. पोलीस स्टेशन ते साईड ब्रँच, सॉईड ब्रँच ते पोलीस स्टेशन/गुन्हे शाखा अशी सातत्याने संगित खुर्ची त्यांना खेळावी लागत आहे. पोलीस स्टेशनची हद्द समजण्याआधीच अनेकांची बदली झाली आहे. दरम्यान आज पुन्हा वीस पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्याने पोलीस दलात खळबळ माजली आहे.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे शिस्तप्रीय आणि गुन्हेगारांमध्ये दहशत असलेले अधिकारी म्हणून ओळखले जातात. यामुळे त्यांनी कार्यभार स्विकारताच काही पोलीस अधिकाऱ्यांनी स्वत:हून साईड ब्रँचला बदली करुन घेतली होती. तर सध्याही अनेकजण पोलीस स्टेशन नको पण साईड ब्रँच द्या, अशी मागणी करत आहेत. तर दुसरीकडे पोलीस ठाण्याचा कार्यभार स्विकारलेल्यांना पोलीस आयुक्त एक दोन महिन्यातच उचलबांगडी करत आहेत. यामुळे नक्की करायचे काय? आणि पोलीस आयुक्तांची भुमिका काय असा प्रश्न सर्व अधिकाऱ्यांना पडला आहे. पोलिस आयुक्तांनी कारभार स्विकारताच शहरातील अवैध धंदेवाले तसेच सराईत गुन्हेगारांची शाळा घेतली होती. यामुळे गुन्हेगारांमध्ये त्यांची चांगलीच दहशत बसली आहे. मात्र त्याहीपेक्षा आता सातत्याने होणाऱ्या खात्याअंतर्गत कारवाई आणि बदल्यांमुळे पोलीस अधिकाऱ्यांमध्येच दहशत माजली आहे.अधिकाऱ्यांची बदली होण्यामागे छोटीशी चुकही कारणीभूत ठरत आहे. यामुळे पोलीस अधिकाऱ्यांनी आत्मविश्वासच गमावला आहे. नव्याने कोणी पोलीस ठाण्याचा कारभार स्विकारण्यास तयार नसताना जे आहेत त्यांनाही हटवले जात आहे. ज्यांची मनापासून ईच्छा नाही अशांवरही पोलीस ठाण्याचा कारभार सोपवला जात आहे.
पोलीस निरीक्षकांचे नाव – सध्याचे ठिकाण, बदलीचे ठिकाण
शशिकांत चव्हाण ( वपोनि, लोणी काळभोर ते पोनि वाहतूक शाखा) ,स्वप्नाली शिंदे ( वपोनि डेक्कन ते पोनि सायबर) ,राजेंद्र मगर (वपोनि लष्कर ते पोनि, आर्थिक गुन्हे शाखा) ,दिपाली भुजबळ (वपोनि विश्रामबाग ते पोनि़ आर्थिक गुन्हे शाखा), आनंदराव खोबरे ( वपोनि विमानतळ ते पोनि गुन्हे शाखा)विश्वजित काईगडे (वपोनि खडक ते पोनि, नियंत्रण कक्ष) ,अजय कुलकर्णी (पोनि, नियंत्रण कक्ष ते पोनि, आर्थिक गुन्हे शाखा) ,शैलेश संखे (वपोनि, चतु:श्रृंगी ते पोनि, गुन्हे शाखा) ,संतोष सोनवणे (वपोनि, कोंढवा ते पोनि, वाहतूक शाखा) महेश बोळकोटगी ( वपोनि, मुंढवा ते वपोनि, चतु:श्रृंगी), विनय पाटणकर (वपोनि, बिबवेवाडी ते वपोनि, कोंढवा), गिरीश दिघावकर (वपोनि खडकी ते वपोनि, लष्कर), मंगल मोढवे (पोनि, गुन्हे हडपसर ते वपोनि बिबवेवाडी), राजेंद्र करणकोट ( पोनि, गुन्हे वानवडी ते वपोनि लोणी काळभोर) ,सतिश जगदाळे ( पोनि, गुन्हे डेक्कन ते वपोनि खडकी) ,संतोष खेतमाळस (पोनि, खडक ते वपोनि, खडक)
विजममाला पवार (पोनि, चतु:श्रृंगी ते वपोनि, विश्रामबाग) , नीळकंठ जगताप ( पोनि, गुन्हे वारजे माळवाडी ते वपोनि, मुंढवा) ,अजय संकेश्वरी (पोनि, वाहतूक ते वपोनि, विमानतळ), गिरीषा निंबाळकर (पोनि, गुन्हे शिवाजीनगर ते वपोनि, डेक्कन) या पोलीस निरीक्षकांची तात्पुरती नेमणूक करण्यात आली असल्याचे आदेशात म्हटले आहे़.