
सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर ही अभिनेत्री भडकली, सोशल मिडीयावर संताप व्यक्त, पण पोस्टही डिलीट?

मुंबई- अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर अनेक सेलिब्रेटी आपल्या सुरक्षेबाबत दक्ष झाले आहेत. त्यातच करीना कपूरने माध्यमांसमोर आपली नाराजी व्यक्त केली आहे. अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर व्हिडीओ शेअर केल्यामुळे चर्चा सुरु झाली आहे.


सैफवर हल्ला झाल्यापासून मिडीयावर सैफ अली खानवरील चाकू हल्ल्याच्या बातम्या सुरु आहेत. तर दुसरीकडे पापाराझीदेखील सैफच्या घराबाहेर तळ ठोकून आहेत. त्यांच्या प्रत्येक क्षणाचे फोटो व्हायरल करण्यात येत आहे. नुकतीच सैफ आणि करिना कपूरच्या घरात लहान मुलांसाठी लागणारी खेळणी आणण्यात आली होती. पण त्याचेही फोटो काढून सोशल मीडियावर अपलोड करण्यात आले. त्यामुळे करीना चांगलीच संतापली होती. तिने इन्स्टाग्रावर स्टोरी टाकून थेट आपला राग व्यक्त केला आहे. “कृपा करून आता हे सगळं काही थांबवा, आम्हाला एकटं सोडा. आम्हाला शांतीने जागू द्या” अशा शब्दात तिने आपली प्रतिक्रिया दिली होती. पण पुढच्याच काही मिनिटांत तिने ही स्टोरी डिलिट केली. त्यामुळे तिने स्टोरी डिलिट का केली? असा प्रश्न सोशल मीडियात विचारला जात आहे. करीनाच्या या प्रतिक्रियेनंतर सोशल मीडियावरील तिच्या चाहत्यांनीही तिच्या विधानाचे समर्थन केले आहे. चाहत्यांनी करीनाच्या कुटुंबाला प्रायव्हसी देत सतत कव्हर करणे थांबवले पाहिजे असे आवाहन केले आहे. दरम्यान सैफवरील हल्ल्यानंतर करीना तिच्या कुटुंबासह रुग्णालयात आहे आणि सैफची काळजी घेत आहे.

सैफ अली खानवर सध्या मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार चालू आहेत. सध्या त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. सैफ अली खानवर चाकू हल्ला करणाऱ्या आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून त्याच्यावर पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत.










