शरद पवारांच्या विरोधात उद्धव ठाकरे, पुण्यात उबाठाची स्ट्रॅटर्जी ठरली,बघा सविस्तर

पुण्याच्या पालिका निवडणुकीसाठी शरद पवार आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र आली आहे. यानंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेनेही कंबर कसलीय. ठाकरेंची शिवसेना आता काँग्रेसलासोबत घेऊन पुणे महापालिकेत उतरणार आहे.

उबाठाचे नेते सहिन अहिर आणि काँग्रेस नेते सचिन अहिर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत पुणे पालिकेत केलेल्या आघाडीची माहिती दिली. आमची 2 वेळा राष्ट्रवादीशी चर्चा झाली. पण काही उत्तर आलं नाही. यामुळे आम्हाला उशीर झाला. आम्ही यावेळेस दक्ष होतो, असे सतेज पाटील म्हणाले. 7 वर्षाचा महायुतीचा भ्रष्ट कारभार लोकांसमोर आहे. पुण्याची पाण्याची समस्या सुटलेली नाही. मग सत्तेचा वापर तुम्ही स्वत: साठी करताय का? असा प्रश्नही त्यांनी विचारला. पुण्यात पहिल्या टप्यात काँग्रेस 60 तर शिवसेना 45 जागांवर एबी फॉर्म देणार आहेत. फायनल यादी राञी उशिरा जाहीर केली जाणार आहे. मनसेनं आमच्याकडे 32 जागांची यादी दिली होती. आम्ही 20-21 जागांवर सहमती दर्शवलीय अजून फारतर 2-4 जागा मागे पुढे होऊ शकतात.आमची मनसेसोबत अजूनही चर्चा सुरु असल्याची माहिती सचिन अहिर यांनी दिलीय. आमचा फॉर्मुला तर ठरलाय. जे घटक पक्ष आहेत, त्यांच्याविषयी आमच्या चर्चा सुरु असल्याचे सहिन आहिर यावेळी म्हणाले.

महापालिका ही स्वायत्त संस्था आपण मानतो. 29 ऑगस्टला कायदा करुन त्याचे अधिकार जॉइंट डायरेक्टर्सना देण्यात आलेय. तेच टाऊन प्लानिंग करतायत. लोकशाही ही पालिकेत टीकली पाहिजे, असे विषय घेऊन आम्ही पालिका निवडणुकीत उतरणार असल्याचे सतेज पाटील म्हणाले. पुणे-पिंपरीमध्ये विरोधक ठेवायचे नाहीत हे भाजपचे प्लानिंग आहे. महायुतीतून आम्ही इकडे लढू, तुम्ही तिकडे लढा असे त्यांचे ठरले. काहींना राजकीय आजार झाले. तो त्यांच्या स्टॅटर्जीचा भाग आहे. विरोधी पक्ष म्हणून सत्तेत परिवर्तन करायचे असेल तर कॉंग्रेस आणि उबाठाच असू शकतो, असे सचिन अहिर म्हणाले. पुणे पालिकेत आम्हाला बहुमत मिळाले नाही तर आम्ही भाजपसोबत जाणार नाही, हे अजित पवारांनी जाहीर करावं. 15 दिवसांचा तात्पुरता घटस्फोट घ्यायचा, आम्ही बोलत नाही असं सांगायच आणि पुन्हा एकत्र यायचं, अशी टीका सचिन अहिर यांनी केली.