
मुंबई – गेट वे ऑफ इंडियापासून एलिफंटाकडे जाणारी नीलकमल नावाची एक प्रवासी बोट बुडाल्याची घटना मुंबईत घडली आहे. या बोटीत सुमारे ८० प्रवासी होते. त्यापैकी ७७ प्रवाशांची सुटका करण्यात आली आहे. तर तीन प्रवाशाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. दरम्यान या बोट अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

मुंबईतील गेटवे ऑफ इंडियापासून समुद्रात बोटीने प्रवास करण्यासाठी अनेक पर्यटक दाखल होत असतात. या पर्यटक प्रवाशांना समुद्राची सेहर करण्यासाठी फेरीबोट आहेत. या बोटीमधून पर्यटक समुद्रात फेऱ्या मारतात. यातील एका बोटीचा अपघात झाला. दुर्घटना घडल्यानंतर मुंबईतील कोस्ट गार्ड, पोलिस, हेलिकॉप्टरच्या सहाय्याने प्रवाशांना वाचवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान भारतीय नौदलाची एक स्पीडबोटीने धडक दिल्यानेच निलकमल प्रवासी बोट बुडाली असल्याचा आरोप मालकाकडून करण्यात आला आहे. दुसरीकडे दुर्घटनेत मृत्यू झाल्याची माहिती आहे. मृतांचा आकडाही वाढण्याची शक्यता आहे. ८० जणांना घेऊन जाणाऱ्या फेरीतून घटनेचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. स्पीडबोटची धडक जोरात बसल्याने आमच्या बोटीत पाणी शिरु लागलं आणि बोट बुडू लागली अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.

https://x.com/Conflict_IntelX/status/1869408112945369367?t=n_-agjzPotKnmiBckN-1xg&s=08
“एलिफंटाकडे जाणाऱ्या नीलकमल या बोटीचा अपघात घडल्याचे वृत्त प्राप्त झाले. नौदल, कोस्टगार्ड, पोर्ट, पोलिस पथकच्या बोटी तातडीने मदतीसाठी रवाना करण्यात आल्या आहेत. जिल्हा आणि पोलिस प्रशासनाशी सातत्याने आम्ही संपर्कात असून, सुदैवाने बहुसंख्य नागरिकांना वाचविण्यात आले आहे. तथापि अजूनही बचावकार्य सुरू आहे. बचावकार्यासाठी सर्व त्या यंत्रणा तैनात करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत,” अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.









