
लग्नाचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल, अभिनेत्री बनली कुरवली, लग्न थाटामाटात संपन्न

सोलापूर – अभिनेत्री रिंकू राजगुरू नेहमीच तिच्या कामामुळे आणि चित्रपटांसाठी चर्चेत राहिली आहे. रिंकूचा सोशल मीडियावर चाहते वर्ग देखील जास्त आहे. रिंकू सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असते. पण आता रिंकू वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. तेही तिच्या आईवडिलांमुळे.


रिंकूच्या आई आणि बाबांनी दुसऱ्यांदा लग्न केल्याची बातमी समोर आली आहे. रिंकूच्या आई-बाबांच्या दुसऱ्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर आता व्हायरल होत आहेत. रिंकूची आई आशा आणि वडील महादेव राजगुरू यांच्या लग्नाला २५ वर्ष पूर्ण झाली आहेत. याचनिमित्ताने रिंकूची आई आशा राजगुरू यांनी सोशल मीडियावर दुसऱ्या लग्नाचे फोटे शेअर केले आहेत. लग्नाच्या २५ व्या वाढदिवसाची शेअर करून त्यांनी कॅप्शनही दिले आहे. चाहत्यांनी त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, खास म्हणजे आईच्या दुसऱ्या लग्नात रिंकू करवली झाली होती. निळी साडी नेसून रिंकू आई-वडिलांच्या लग्नात वावरताना दिसली होती. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोत ते दोघे लग्नाच्या वाढदिवसाचा केक कापताना दिसत आहेत. रिंकूची आई आशा यांनी कुटुंबासोबतचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, लग्नाच्या २५व्या वाढदिवसाची काही क्षणचित्रे. त्यांच्या पोस्टला चाहत्यांनी लाइक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. चाहते त्यांच्या फोटोवर वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. रिंकूची आई आशा आणि वडील महादेव राजगुरू यांच्या २६ व्या लग्नाच्या वाढदिवशी रिंकू खूप सुंदर आणि आकर्षित दिसत होती.

आशा राजगुरू आणि महादेव राजगुरू दोघेही शिक्षक आहेत. रिंकूच्या आईने देखील ‘सैराट’मध्ये छोटीशी भूमिका केली होती. ‘सैराट’ या चित्रपटानंतर रिंकू ‘कागर’, ‘मेकअप’, ‘अनपॉज्ड’ आणि ‘झिम्मा २’ सारख्या चित्रपटात ती दिसली होती. सध्या ती जिजाई चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. तिने मराठीसोबतच हिंदी चित्रपट आणि वेब सिरिजमध्ये काम केले आहे.










