सोना”आई” शाळेमध्ये पालखी सोहळा उत्साहात पार पडला. आकर्षक फुलांनी सजवलेली पालखी आणि त्यामध्ये विठ्ठल रुक्मिणी यांच्या मूर्ती तसेच संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका ठेवण्यात आल्या होत्या. शाळेतील विद्यार्थी पारंपारिक वारकरी वेशभूषेत आले होते.
विद्यार्थिनी नऊवारी साडी तसेच डोक्यावर तुळस घेऊन सहभागी झाल्या होत्या. विद्यार्थ्यांनी वारकरी वेशात टाळ, वीणा हाती घेतले होते. ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’च्या जयघोषात शाळा व परिसर दुमदुमुन गेला होता. शाळेच्या परिसरात दिंडी काढण्यात आली. शाळेत सर्व विद्यार्थी तसेच शिक्षकांनी फुगडीचा आनंद लुटला. विठ्ठल रुक्मिणी ,ज्ञानेश्वर ,तुकाराम,मुक्ताई वारकऱ्याची वेशभूषा मुलांनी केली होती. विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षिकांनी गोल रिंगण करून, ‘ज्ञानोबा- तुकाराम’च्या ठेक्यावर पालखीचा आनंद घेतला. या पालखी सोहळ्यात सर्व विद्यार्थी उत्साहात सहभागी झाले होते.
शाळेचे ट्रस्टी राजलक्ष्मण राव आणि शिक्षक वर्ग शिक्षकेत्तर कर्मचारी ,पालक वर्ग, विद्यार्थी यांच्या उपस्थितीत पालखी सोहळा मोठ्या आनंदात जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील सोनाली कामठे, वैशाली जोगदंड, उद्धव बोतला, राधिका मोरे, वैशाली कोळेकर, योगश्री गिरी, नेहा घोडके, सुप्रिया मगर, वैशाली लोखंडे, संगिता आरबोला, पालवी वडवले, विशय कडू, ज्योतिश्री,नेहा माळी, पोपट मोरे आदी शिक्षक व शिक्षिका उपस्थित होत्या.