संतापजनक ! घराबाहेर खेळणाऱ्या २ वर्षाच्या चिमुकलीसोबत अत्याचार, मुंबईतील घटना

xr:d:DAFjVytz8Dg:8,j:5023806371,t:23051907

मुंबई – अवघ्या काही दिवसांपूर्वी बदलापूरमधील एका शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाला होता, त्यानंतर संपूर्ण राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. विरोधकांनी आंदोलन करत सरकारला धारेवरही धरलं. पण राज्यात अद्यापही असे विकृत नराधम फिरतच आहेत. त्याचाच प्रत्यय पुन्हा आला आहे.

मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कल्याणजवळही अशीच एक अतिशय संतापजनक घटना घडली आहे. घराबाहेर खेळणाऱ्या अवघ्या दोन वर्षांच्या मुलीला अत्याचाराला बळी पडावं लागलं. अवघ्या दोन वर्षांच्या त्या चिमुकलीवर नराधम इसमाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कल्याण जवळील टिटवाळा दहागाव परिसरातील संतापजनक घटना आहे.

बाहेर खेळणारी ही मुलगी थोड्या वेळाने घरी रडत परत गेली, आई-वडिलांनी रडण्याचं कारण विचारल्यानंतर, भेदरलेल्या त्या चिमुकलीने कसंबसं काय घडलं ते सांगितलं आणि हा संतापजनक प्रकार उघडकीस आला. हादरलेल्या पालकांनी तत्काळ टिटवाळा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत तातडीने कारवाई करून अत्याचार करणाऱ्या नराधम विकृत आरोपीला अटक केली. याप्रकरणी तपास सुरू आहे.