आळंदी शहरात आजपासून वाहनांना बंदी ; माऊलींच्या पालखीचे शनिवारी होणार प्रस्थान

 संत ज्ञानेश्वर महाराज सोहळा आषाढी पायीवारीसाठी २९ जूनला आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. यापार्श्वभूमीवर वारकऱ्यांची आणि अत्यावश्यक सेवा पुरवणारी वाहने वगळता इतर वाहनांना आजपासून दि.२५ पासून आळंदी परिसरात प्रवेश बंदी करण्यात आली आहे.पालखी सोहळ्यात दरवर्षीपेक्षा जास्त भाविक सहभागी होण्याची शक्यता असल्याने हा बदल करण्यात आला असून वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन आळंदी पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

चाकण येथून चिंबळी फाटा चौकमार्गे आळंदीकडे येणारी वाहने आणि आळंदी फाटा चाकण येथून आळंदीकडे येणारी वाहने जय गणेश साम्राज्य चौक व अलंकापुरम चौक मार्गे तसेच भोसरी चौकातून मॅगझीन चौक मार्गे वळविण्यात आली आहेत. चाकण-शेलपिंपळगाव- वडगाव घेनंदमार्गे आळंदीकडे येणारी वाहने कोयाळी फाटा कोयाळी गावातून मरकळगाव मार्गे वळविण्यात आली आहे. मरकळकडून धानोरे फाटा मार्गे आळंदीकडे येणारी वाहने धानोरे फाटा- चऱ्होली फाटा-मॅगझीन चौक- अलंकापुरम चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.भारतमाता चौक-मोशी चौक येथून आळंदीकडे येणाऱ्या वाहनांना शहरात प्रवेश दिला जाणार नाही. या मार्गावरील वाहतूक जय गणेश साम्राज्य चौक, अलंकापुरम चौक मार्गे, भोसरी चौकातून मॅगझीन चौक मोशीमार्गे चाकण- शिक्रापूर मार्गे वळविण्यात आली आहे. पुणे-दिघी मॅगझीन चौकाकडून आळंदीकडे येणारी वाहने भोसरी-मोशी- चाकण, चऱ्होली फाटा-कोयाळी, शेलपिंपळगाव आणि अलंकापुरम-जय गणेश साम्राज्य चौक मार्गे वळविण्यात आली आहे.

पुणे बाजूकडून आळंदीकडे येणाऱ्या वाहनांना चऱ्होली फाटा चौकाचे पुढे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. तसेच मोशी बाजूकडून आळंदीकडे येणाऱ्या वाहनांना डुडुळगाव जकात नाक्याचे पुढे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येत आहे. चिंबळी बाजूकडून आळंदीकडे येणाऱ्या वाहनांना केळगाव चौक-बापदेव चौकाचे पुढे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. चाकण बाजूकडून आळंदीकडे येणाऱ्या वाहनांना इंद्रायणी हॉस्पिटलचे पुढे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येत आहे.वडगाव-घेनंद बाजूकडून आळंदीकडे येणाऱ्या वाहनांना विश्रांतवडचे पुढे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येणार आहे. मरकळ बाजूकडून आळंदीकडे येणाऱ्या वाहनांना धानोरी फाटा-पीसीएस चौकाचे पुढे जाण्यास प्रवेश बंदी करण्यात आली आहे. सदरची सर्व मार्गावरील वाहतूक दि.२५ दुपारी १२ पासून ते दि.३० रात्री नऊ वाजेपर्यंत बंद राहणार आहे.