सोने आणि चांदीच्या दराचे नवे विक्रम, आजचा भाव काय?

नवरात्रात सोन्या चांदीची चमक वाढली, एका महिन्यात इतक्या रुपयांनी महागले सोने, चांदीची चकाकली, नेमके कारण काय?

मुंबई – नवरात्र आणि सणासुदीच्या काळात सोन्याच्या मागणीत वाढ होत असल्याने भाव पुन्हा एकदा विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणूनही सोन्याचा विचार होत असल्याने भावात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे ग्राहक देखील सोने खरेदीबाबत साशंक आहेत.

सोने बाजारात आज बुधवार, २४ सप्टेंबररोजी देशभरात सोने १,१४,३६० प्रति १० ग्रॅम या दराने विकले जात आहे. त्याचबरोबर बुलियन मार्केटमध्ये आज जीएसटीशिवाय सोनं १,१४,०४४ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडलं. तर, चांदी जीएसटीशिवाय १,३४,९०५ रुपयांवर उघडली. जीएसटीसह २४ कॅरेट सोन्याचा भाव आता १,१७,४६५ रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदी १,३८,९५२ रुपये प्रति किलोवर आहे. आज २२ कॅरेट सोन्याची किंमत २४८ रुपयांनी घसरून १,०४,४६४ रुपये प्रति १० ग्रॅमवर आली आहे. जीएसटीसह ती १,०७,५९७ रुपये झाली आहे. तर १८ कॅरेट सोन्याची किंमत २०३ रुपयांनी घसरून ८५,५३३ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडली आणि जीएसटीसह ती ८८,०९८ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचली आहे. डॉलर निर्देशांक आणि जागतिक वित्तीय बाजारातील चढ-उतार तसेच अमेरिकन मुख्य पीसीई महागाईच्या आकडेवारीच्या प्रतीक्षेमुळे या आठवड्यात सोनं आणि चांदीच्या किमतींमध्ये अस्थिरता कायम राहण्याची शक्यता आहे. दरम्यान गुंतवणूकदार आणि ग्राहक सोने व चांदी ही सुरक्षित गुंतवणूक समजून खरेदीला प्राधान्य देत आहेत.

या सप्टेंबर महिन्यात सोनं प्रति १० ग्रॅम ११,६५६ रुपयांनी महाग झालं आहे. तर, चांदीच्या किमतीत प्रति किलो १७,३३३ रुपयांची वाढ झाली आहे. आयबीजेएच्या दरानुसार, ऑगस्टच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी सोने प्रति १० ग्रॅम १,०२,३८८ रुपयांच्या दरावर बंद झालं होतं. चांदीही १,१७,५७२ रुपये प्रति किलोच्या दरावर बंद झाली होती.