मामीच्या प्रेमात वेडा झाला भाचा, पत्नीने केला विरोध तर पाजलं ऍसिड अन्…..

(प्रतिनिधी – प्रियंका बनसोडे) – बिहारमधील भागलपूर इथं पतीने आधी पत्नीला ॲसिड पाजलं आणि नंतर तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावली. पोलिसांनी आरोपी पती व त्याच्या मामीला अटक केली आहे. ही दुर्दैवी घटना नवगछियाच्या रंगरा पोलीस स्टेशन परिसरातील जहांगीरपूर बैसी गावातील आहे.

या ठिकाणी राहणाऱ्या फैयाजचं लग्न खारीक पोलीस ठाणे हद्दीतील रहिवासी शबनम खातुन हिच्याशी दोन वर्षांपूर्वी झालं होतं. काही दिवसांनंतर शबनमला तिचा पती फैयाजचे त्याची मामी रिना खातुनशी विवाहबाह्य लैंगिक संबंध असल्याचा संशय आला. तिने या गोष्टीला विरोध केला. पत्नीने विरोध केला असता फैयाज आणि त्याची प्रेयसी मामी यांनी शबनमला मारहाण करण्यास सुरुवात केली. शबनमच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार,४ ऑगस्ट रोजी शबनमची आई शमीमा यांना फैयाज व रीना यांनी त्यांच्या मुलीची हत्या करून मृतदेह गायब केल्याचं कळा लं.

यानंतर मुलीच्या कुटुंबियांनी रंगरा पोलीस स्टेशन गाठून या प्रकरणी तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करून आरोपी फैयाज व त्याची मामी रिना यांना अटक केली, असं नवगछियाचे एसडीपीओ ओम प्रकाश यांनी सांगितलं.चौकशीदरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी फैयाज व त्याची प्रेयसी मामी यांनी शबनमची हत्या केली. त्याला तिला ॲसिड पाजलं आणि नंतर गळा आवळून खून केला. आरोपींनी शबनमचा मृतदेह कोसी नदीत फेकल्याचंही सांगितलं. पोलिसांनी आरोपीच्या सांगण्यावरून घटनेत वापरलेली ॲसिडची बाटलीही जप्त केली आहे. दोघांचीही तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.