नवनीत राणा ढसाढसा रडल्या,व्हिडीओ व्हायरल…बघा नेमकं तिथे काय घडलंय

लोकसभा निवडणूक आता काही आठवड्यांवरच येऊन ठेपली आहे. अशात राज्यातील राजकारणात हालचालींना वेग आला आहे. भाजपने नवनीत राणा यांना अमरावती लोकसभेचं तिकीट जाहीर केलं आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघातून नवनीत राणा पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. त्यांना भाजपने तिकीट जाहीर केलं आहे. यानंतर नवनीत राणा यांनी आपल्या युवा स्वाभिमान पक्षाचा राजीनामा दिला. यावेळी त्या भावुक झाल्या.

खासदर नवनीत राणा यांनी युवा स्वाभिमान पक्षाचा राजीनामा दिला. खासदर नवनीत राणा या रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्याध्यक्ष होत्या. यावेळी राजीनामा देताना नवनीत राणा यांना अश्रू अनावर झाले. युवा स्वाभिमान पक्षाच्या सर्व पदांचा त्यांनी राजीनामा दिला. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले होते. नवनीत राणा भावुक झाल्या होत्याराजीनामा दिल्यावर प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्या, की एका छोट्या संघटनेला मोठ्या पक्षाचं रूप देणं. एक आमदार या पक्षाने घडवला. त्याच पक्षाने खासदार बनवलं. त्याच पक्षाने एका छोट्या कार्यकर्त्याला अमरावतीची खासदार म्हणून मोठी जबाबदारी दिली. अशा पक्षाचा राजीनामा देण्याची भावना, ती धाकधुकी कायम आहे. आता देशासाठी काम करण्यासाठी एक नवी इनिंग सुरू करत आहे. 12 -13 वर्ष ज्या पक्षात काम केलं त्याचा राजीनामा देताना ती भावना डोळ्यातून अश्रूच्या माध्यमातून आली’ असं म्हणत त्या यावेळी भावुक झाल्या.

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या उमेदवारीला महायुतीतील घटक पक्षाचे नेते विरोध करत होते. खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी देऊ नये यासाठी शिंदे गटासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीही विरोध केला होता. महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या प्रहार संघटनेचे प्रमुख यांनीही राणांच्या विरोधात उमेदवार देणार असल्याचा इशारा दिला होता. विशेष म्हणजे भाजपच्या अमरावतीच्या स्थानिक नेत्यांनी देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे नवनीत राणाच्या उमेदवारीला विरोध केला होता. असेही असतानाही भाजपने नवनीत राणा यांनाच अमरावती लोकसभेचं तिकीट जाहीर केलं आहे.