मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्यास मनाई, या ठिकाणी आंदोलन करावे लागणार, जरांगे निर्णयावर ठाम
मुंबई- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टला “चलो मुंबई” हा नारा देत आंदोलक मोहीम सुरू केली होती. मात्र त्याआधी मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्यास मनाई करत जरांगेना धक्का दिला आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना मुंबई हायकोर्टानं झटका दिला आहे. पोलीस प्रशासानानं परवानगी दिली नसल्यानं आझाद मैदानात आंदोलनासाठी कोर्टानं जरांगेंना मनाई केली आहे. जरांगे आणि त्यांच्या आंदोलकांना शांततेनं आंदोलन करण्याचा अधिकार आहे. पण आझाद मैदानात परवानगीशिवाय आंदोलन करता येणार नाही. गणपती उत्सवादरम्यान, अशा प्रकारच्या आंदोलनांमुळं मुंबईत कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यामुळं कायदा-सुव्यवस्थेवर ताण येईल. त्यामुळं खारघर इथं जरांगेंना उपोषणासाठी पर्यायी मैदान उपलब्ध करुन देता येईल, असं सरकारी वकिलांनी यावेळी सरकारची बाजू मांडताना सांगितले आहे. मराठा समाज आपल्या आपल्या मुलांसाठी आरक्षणाची मागणी करत मनोज जरांगे २७ ऑगस्ट रोजी आंदोलन करणार होते. मुंबईकडे जाण्यासाठी मराठा बांधवांना आंदोलनात सामिल होण्याचं आवाहनही करण्यात आलं होत. मात्र त्याआधी मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्यास मनाई केली आहे. जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने कूच करतील का, की सरकारच्या विनंतीला मान देऊन आंदोलन पुढे ढकलतील, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि त्यावरील सरकारचे पुढील पाऊल यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
जरांगे पाटील यांनी आपल्या मागण्यांवर ठाम राहण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांनी स्पष्ट केले की, जोपर्यंत मराठा आरक्षणासंबंधी मागण्यांची पूर्तता होत नाही, तोपर्यंत ते आंदोलन मागे घेणार नाहीत किंवा त्यात कोणताही बदल करणार नाहीत, त्यामुळे हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे बनले आहे.