आई शप्पथ! पाऊस पुन्हा एकदा महाराष्ट्राला झोडपून काढणार

महाराष्ट्रात या तारखेपासून कोसळणार मुसळधार पाऊस, या जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी, सरकारची शेतकऱ्यांना सूचना

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडे आहे आणि नैऋत्य मान्सूनने राज्यातून निरोप घेतला आहे. मात्र, 15 ऑक्टोबर पासून राज्यातील हवामानात परत एकदा बदल अपेक्षित असून किमान १८ ऑक्टोबरपर्यंत विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान आणि दुपारनंतर वादळी पाऊस अपेक्षित आहे.

मे महिन्याच्या शेवटी राज्यभर जोरदार पाऊस सुरू झाला, जून-जुलैमध्ये मध्यम प्रमाणात पावसाची नोंद झाली, तर ऑगस्टमध्ये अनेक भागांत मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी नुकसान केले. तर सप्टेंबरमधील पावसाने विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाने जोर राखला. यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले होते. हवामान खात्याने १५ ऑक्टोबरपासून राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. अंदाजानुसार, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात दुपारी वीजसह पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर काही भागांत वारा आणि विजाही चमकू शकते. राज्य सरकारने शेतकऱ्यांना आपली पिकं सुरक्षित ठेवण्याचे आणि हवामानातील अचानक बदलांपासून संरक्षण करण्याचे आवाहन केले आहे. IMDच्या अंदाजानुसार, खान्देश आणि पश्चिम महाराष्ट्रातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी हवामान कोरडे झाल्यामुळे मान्सून संपल्याची चर्चा सुरू होती, पण आता परिस्थिती अचानक बदलू शकते. मुंबई, पुणे आणि मराठवाडा यासह अनेक भागांमध्ये मान्सून संपल्याची चर्चा चालू असताना, हवामान खात्याने १५ ऑक्टोबरपासून जोरदार पाऊस आणि मेघगर्जनेसह हवामान बदलू शकतो, अशी माहिती दिली आहे. नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.

सुरुवातीला असा अंदाज वर्तवण्यात आला होता की ५ किंवा ६ ऑक्टोबरपर्यंत मान्सून पूर्णपणे माघार घेईल. आता पुन्हा एकदा राज्यात विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह आणि जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.