
इन्स्टाग्राम मित्राने लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार केला. ही घटना वारजे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मार्च २०२४ ते मे २०२४ या कालावधीत घडला आहे.याप्रकरणी खेड तालुक्यातील २५ वर्षाच्या तरुणीने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन करण दिलीप गोळे याच्या विरोधात आयपीसी ३७६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी करण आणि पीडित मुलीची मार्च २०२४ मध्ये इन्स्टाग्रामवर ओळख झाली. दोघांमध्ये चॅटिंग सुरु झाले. या दरम्यान करण याने पीडितेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर दोघांच्या भेटी गाठी सुरु झाल्या. एक दिवस आरोपीने पीडित मुलीला वारजे परिसरातील एका लॉजमध्ये नेले. तिला लग्नाचे आमिष दाखून तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तो तिचे सतत लैंगिक शोषण करु लागला. पीडितेने लग्नाबाबत विचारले असता तो टाळाटाळ करत होता. पीडितेने लग्नासाठी दबाव टाकला असता त्याने लग्न करण्यास नकार दिला. प्रेमात दगा मिळाल्याने पीडितेने वारजे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.









