
पुणे – मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असतानाही आई, वडिल, आजीने तिचा विवाह लावून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी येरवडा येथील १७ वर्षाच्या मुलीने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार मिना राजेश इरले (वय ४०), राजेश इरले (वय ४२), शोभा नवगिरे (वय ५५), संगिता रंजित गायकवाड (वय ५०), पती गणेश टाकळकर (वय २४), संजय टाकळकर (वय ५५) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ३ मार्च ते ३० जून २०२३ दरम्यान वाफगाव टाकळकरवाडी येथे घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या अल्पवयीन आहेत, हे माहिती असताना तिचे आई वडिल व इतरांनी तिला वाफगाव येथे नेले. तेथे तिचा विवाह लावून दिला. पतीने तिच्याशी जबरदस्तीने इच्छेविरुद्ध वारंवार शारिरीक संबंध ठेवले. तो तिला शिवीगाळ करुन मारहाण करीत. तसेच जातीवाचक शिवीगाळ करत असल्याने तिने फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी बालविवाह कायदा व अॅट्रोसिटी अॅक्टखाली गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक देशमाने तपास करीत आहेत.









