मराठा आरक्षणासाठी लढणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक असलेले अमोल खुणे यांच्यावर चार अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यांमध्ये अमोल खुणे यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गेवराईहून आपल्या धानोरा गावी जात असताना रस्त्यात दबा धरून बसलेल्या चार जणांनी अमोल खुणे यांच्यावर अचानक दगडफेक केली आणि या दगडफेकीमध्ये अमोल खुणे यांच्या डोक्याला जबर मार लागला. या हल्ल्यात जबर जखमी झालेले अमोल खुणे रस्त्यावर उभे असताना त्यांना काही स्थानिक लोकांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत
बघा लाइव्ह व्हिडीओ 👇
मनोज जरांगें यांच्या सहकाऱ्यावर जीवघेणा हल्ला,डोकं फुटून रक्तबंबाळ,LIVE VIDEO #manojjarangepatil
कोपर्डी बलात्कारातील आरोपीवर हल्ला केल्याप्रकरणी अमोल खुणे हे दोन वर्ष जेलमध्ये होते. जेलमधून बाहेर आल्यानंतर अमोल खुणे यांनी जरांगे पाटील यांच्यासोबत काम सुरू केलं. मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असून मराठा आरक्षणाच्या आंदोलनावरूनच त्यांच्यावर हल्ला झाल्याचा आरोप सहकाऱ्यांनी केला आहे.