मनोज जरांगे पाटील यांची देहू येथे सदिच्छा भेट, पांडुरंग आवारे-पाटील यांना दिल्या शुभेच्छा

हवेली प्रतिनिधी : मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील हे पुण्यातून आपला नियोजित कार्यक्रम करून आळंदी मार्गे पुढील कार्यक्रमांसाठी जात आसताना शिवसंग्राम संपर्कप्रमुख पिंपरी-चिंचवड शहर पुणे पांडुरंग आवारे-पाटील यांच्या देहू फाटा आळंदी येथील काॅटन इंडिया हाऊसला सदिच्छा भेट दिली.यावेळी मनोज जरांगे-पाटील यांचे भव्य स्वागतफटाके फोडून करण्यात आले . यावेळी मनोज जरांगे-पाटील यांचा सत्कार शाल श्रीफळ देऊन पांडुरंग आवारे-पाटील, हनुमंत आवारे-पाटील, यांनी केला.मनोज जरांगे-पाटील यांनी पांडुरंग आवारे-पाटील यांना त्यांच्या सर्व सहकार्याना पुढील उद्योग व्यवसाय,यशस्वीवाटचाली साठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी गंगाधर काळकुटे पाटील, श्रीराम कुरुंदकर, आप्पासाहेब कुढेकर, महेश आण्णा दाभाडे, सचिन हावळे पाटील, अंकुश राक्षे, संजय कटारे, समाधान कागदे, संजय गोडसे, भगवान डोफके, गोकुळ नवथर, उदय भिसे पाटील, बद्रीनाथ तारक, जयदत्त धुटे व अन्य सहकारी उपस्थित होते.

मनोज दादा जरांगे-पाटील आपला प्रत्येकाला हेवा वाटावं असे आपण सर्व सामान्य घटकातील विस्थापित कुटुंबातील मराठा समाजातील लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आजपर्यंत प्रामाणिक पणे काम करत आलात व पुढे ही करत आहात याचा आम्हास सार्थ अभिमान वाटत आहे. खऱ्या आर्थाने लोकनेते विनायक मेटे यांचे स्वप्न मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून पूर्णत्वाकडे जात आहे. याचा देखील आम्हास आपला सार्थ अभिमान असल्याचे पांडुरंग आवारे-पाटील यांनी सांगितले . यावेळी शशिकांत राजे जाधव, आरूण कुरे पाटील, प्रतीक आहेर, वैभव नाईकवाडे, संकेत आनपठ,मंगेश लटके,शुभम गाढवे व अन्य मराठा बांधव उपस्थित होते.