रविवारी दि. ३० जून रोजी लोणावळ्यात मोठी दुर्घटना घडली.पर्यटनासाठी पुण्यातून लोणावळ्याला आलेलं कुटुंब भुशी डॅमच्या बॅक वॉटरमध्ये बुडालं. भुशी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये पावसाचा आनंद घेत असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढला अन् त्यामध्ये ९ जण अडकले. त्यातील चार जणांना वाचवण्यात यश आलं मात्र एक महिला आणि चार मुले वाहून गेले. या घटनेनं अन्सारी कुटुंबावर दुख:चा डोंगर कोसळला आहे.
पुण्यातील अन्सारी कुटुंब पर्यटनासाठी लोणावळ्याला गेलं होतं. मात्र त्यानंतर हे कुटुंब भुशी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये बुडाल्याची घटना घडली आहे. भुशी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये पावसाचा आनंद घेत असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढला अन् त्यामध्ये ९ जण अडकले. त्यातील चार जणांना वाचवण्यात यश आलं मात्र एक महिला आणि चार मुले वाहून गेले. यातील चार जणांचा मृतदेह हाती लागला आहे, मात्र अद्यापही एकाचा शोध सुरू आहे.
दरम्यान या घटनेबाबत आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे बंदी असताना देखील हे कुटुंब या धबधब्याकडे गेलं आणि कुटुंबातील सदस्यांना आपला जीव गमावला लागला. सूचना फलकावरील सूचनेचं पालन केलं असत तर कदाचित जीव वाचला असता. लोणावळ्यात पर्यटन करताना सावधानता बाळगा असा इशारा देऊन ही पर्यटक याकडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येत आहे, भुशी डॅम परिसरात फिरायला आलेल्या पर्यटकांना प्रशासनाने सूचना फलकाद्वारे सूचित केलं आहे, मात्र तरी देखील पर्यटक याकडे कानाडोळा करत असल्याचं चित्र आहे.