
राज्यातील इतक्या आयएएस अधिका-यांची बदली, बदल्यांमुळे प्रशासनात खळबळ

मुंबई – देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा कारभार स्विकारल्यापासून प्रशासनात मोठे बदल केले आहेत. त्यांनी IAS आणि IPS अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या धडाकाच लावला आहे. आता या बदल्याच्या यादीत आणखी एका नवीन बदल्यांची भर पडली असून आणखी अधिका-यांची बदली करण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर प्रचंड बहुमतासह सत्तेत आलेल्या महायुती सरकारमध्ये गेल्या काही महिन्यांपासून आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका लावला आहे. प्रशासनात आपली पकड भक्कम करण्यासाठी या बदल्या करण्यात येत असून स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका जवळ आल्यामुळे या बदल्यांना महत्व आले आहे.
1. डॉ. अशोक करंजकर – यांची उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळ, मुंबईचे सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
2. संजय कोलते – ( जिल्हाधिकारी, भंडारा यांची शिवशाही पुनर्वसन प्रकल्प, मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
3. सुशील खोडवेकर – सदस्य सचिव, उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळ, मुंबई यांना विकास आयुक्त (असंघटित कामगार), मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
4. सावन कुमार – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नंदुरबार यांची जिल्हाधिकारी, भंडारा म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
5. नमन गोयल – प्रकल्प अधिकारी, ITDP, भामरागड आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, अटापली उपविभाग, गडचिरोली यांना मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नंदुरबार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
6. डॉ.जी.व्ही.एस. पवनदत्त – सहाय्यक जिल्हाधिकारी, देसाईगंज उपविभाग, गडचिरोली यांची सहायक जिल्हाधिकारी, इगतपुरी उपविभाग, नाशिक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
7. लघिमा तिवारी – सहायक जिल्हाधिकारी, बल्लारपूर उपविभाग, चंद्रपूर यांची सहायक जिल्हाधिकारी, गोंडपिंपरी उपविभाग, चंद्रपूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.









