हडपसरमधून महायुतीचे उमेदवार चेतन तुपे आघाडीवर तर प्रशांत जगताप पिछाडीवर

आज विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. आज सकाळपासून विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाची यंत्रणा सज्ज झाली आहे.गेल्या पाच वर्षांत राज्यात अभूतपूर्व घडामोडी पाहायला मिळाल्या. मतदारांनी चित्रविचित्र आघाड्या, युती पाहिल्या.या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर यंदा मतदार कोणाला निवडणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. त्यानुसार हडपसर विधानसभा मतदार संघातून चेतन तुपे ४०५३३ हजार मतांनी आघाडीवर आहे.

चेतन तुपे महायुतीचे हडपसर मधून उमेदवार आहे. तर त्यांच्या विरोधात उभे असलेले राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप २४२४० मतां नी पिछाडीवर आहे.चेतन तुपे महायुतीचे हडपसर मधून उमेदवार आहे. तर त्यांच्या विरोधात उभे असलेले राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप पिछाडीवर आहे.

येथून मनसेकडून देखील साईनाथ बाबर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे हडपसर विधानसभा मतदार संघात तिहेरी लढत पाहायला मिळाली. समोर आलेल्या ११ व्या फेरीनुसार, महायुतीचे उमेदवार चेतन तुपे २८, ११७ मतांनी आघाडीवर आहेत.– हडपसर १५ वी फेरी पूर्ण – १९,५९९ लीड – चेतन तुपे.– हडपसरमध्ये सोळाव्या फेरी अखेर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे चेतन तुपे १५५०० मतांनी आघाडीवर