शिरूर: महायुती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या प्रचाराची धमाकेदार सुरुवात मंगलमूर्ती येथील म्हसोबा मंदिरात श्रीफळ अर्पण करून करण्यात आले. हजारोंच्या संख्येने उपस्थित जनसमुदायाने माऊली उर्फ ज्ञानेश्वर कटके यांचे स्वागत करत त्यांना विजयाचा आशीर्वाद दिला. मंगलमूर्तीतील स्थानिकांच्या गरजांचा विचार करणार्या कटके यांना मिळालेला जबरदस्त जनप्रतिसाद हा त्यांच्या लोकप्रियतेचा ठळक पुरावा ठरला.
या कार्यक्रमात नागरिकांनी माऊली कटके यांना विजयी करून अजित पवार आणि महायुतीचे हात बळकट करण्याचा संकल्प व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद नाना कालेवार, शिवसेनेचे शहर प्रमुख मयूर थोरात यांसह विविध पक्षांचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या जनसामुदायिक एकतेच्या माध्यमातून महायुतीची ताकद दाखवली गेली.प्रचारात सहभागी लोकांच्या उत्साहाने मंगलमूर्ती परिसरात एकजुटीची लाट उसळली होती. स्थानिक रहिवासी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे संकल्प देखील व्यक्त केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष शरद कालेवार,शिवसेनेचे श्रीराम सेनेचे सुनिल जाधव,एजाज बागवान, उमेश शेळके, साजिद खान, शिवसेनेचे शहर प्रमुख मयूर थोरात,सुरेश गाडेकर,रणजीत गायकवाड, राजेंद्र घोडके,श्रुतिका झांबरे, माजी नगरसेविका अंजली थोरात,शमशाद भाभी पठाण,रेश्मा क्षिरसागर,फरीदा आपा शेख, अविनाश जाधव, ऋषिकेश लोंढे, सुरज शिंदे पाटिल,राजेंद्र घोडके, अंकुश कांबळे, वैभव कोळपे,विरेंद्र कुरंदळे, दादाभाऊ लोखंडे, सोनु काळोखे, प्रिया बिरादार, राहील शेख, किरण उबाळे, संपत दसगुडे, रोहीत पटवा,तेजस गायकवाड,रंजन झांबरे,अतुल गव्हाणे,राजेंद्र चोपडा,निलेश जाधव, स्वप्नील अण्णा रेड्डी, सचिन गरूडे, सुनिल जठार ,वसीम शहा,धर्मेंद्र कसुरे, सिद्धांत चव्हाण,महेंद्र येवले,साहिल लोंढे, अभिषेक मिसाळ, बबन सपते,संकेत महामुनी, आशुतोष शिंदे यावेळी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.