महाराष्ट्राची प्रसिद्ध डान्सक्वीन झळकणार छोट्या पडद्यावर

मुंबई – सबसे कातील गौतमी पाटील संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तिचा लावणी डान्स आणि दिलखेच अदा पाहण्यासाठी प्रेक्षक तिच्या प्रत्येक कार्यक्रमात गर्दी करत असतात. गौतमीचा स्वतःचा असा एक चाहतावर्ग आहे. स्टेजबरोबर मोठा पडदा वाजवणारी गाैतमी आता लवकरच छोट्या पडद्यावर देखील झळकताना दिसणार आहे.

गौतमी पाटील लवकरच स्टार प्रवाहवर झळकणार आहे. ‘आता होऊ दे धिंगाणा 3’ या कार्यक्रमामध्ये गौतमी पाटील आपल्या अंदाजात ठसकेबाज लावणी सादर करताना दिसणार आहे. या कार्यक्रमाचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. पण हा प्रोमो पाहून काही प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. हा व्हिडिओ शेअर करताना ‘नृत्यांगना गौतमी पाटील थिरकणार धिंगाणाच्या मंचावर…’ अशी कॅप्शन देण्यात आली आहे. आता होऊ दे धिंगाणा शो लवकरच १०० भाग पूर्ण करणार आहे. याच निमित्ताने गौतमीचा खास परफॉर्मन्स पहायला मिळणार आहे. शंभराव्या भागाच्या खास सेलिब्रेशनमध्ये प्रवाह परिवारासोबतच गौतमी पाटील, धनंजय पोवार आणि कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू वालावलकर देखिल सामील होणार आहेत. या प्रोमोमध्ये गौतमीची जबरदस्त लावणी पाहायला मिळत आहे. गौतमीच्या अदा, लावणी पाहून विशाल निकम शिट्टी वाजवताना दिसत आहे. ‘आता होऊ दे धिंगाणा ३’च्या येत्या भागात हे पाहायला मिळणार आहे. दरम्यान सध्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे प्रमाण आणि तिची प्रसिद्धी दिवसेंदिवस वाढत आहे. तसंच गौतमी अभिनय क्षेत्राकडे वळली असून मराठी सिनेसृष्टीत सक्रिय झाली आहे.

https://www.instagram.com/reel/DD6Nm0ttxVY/?igsh=czVpZXFqanUzc29t

गाैतमी अलीकडेच ‘मूषक आख्यान’ चित्रपटात अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्याबरोबर झळकली होती. त्याआधी ‘लाईक आणि सबस्क्राईब’ चित्रपटातील ‘लिंबू फिरवलं’ या गाण्यात गौतमी अमेय वाघबरोबर थिरकली होती. दरम्यान गौतमी पाटीलने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये गौतमीसह अलका कुबल, सई ताम्हणकर, शिव ठाकरे पाहायला मिळाले होते.