महाराष्ट्राची प्रसिद्ध अभिनेत्रीने केले महाकुंभमेळ्यात शाही स्नान

व्हिडिओ शेअर करत सांगितला अनुभव, भावना व्यक्त करताना म्हणाली, मनात आल आणि….

प्रयागराज – उत्तरप्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभमेळ्यात लाखो भाविक दाखल होत आहेत. येथे गंगा, यमुना आमि सरस्वती या नद्यांचा त्रिवेणी संगम होत असल्याने यास विशेष धार्मिक पौराणिक महत्व आहे. आता महाराष्ट्राची क्रश अशी ओळख असणाऱ्या अभिनेत्रीने महाकुंभमेळ्यात शाही स्नान केले आहे.

प्राजक्ता माळी महाकुंभमेळ्यात पोहचली असून तिने संगमात डुबकी घेत पवित्र स्नान केले. याचा व्हिडिओ तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये महाकुंभ मेळ्यात फिरताना प्राजक्ता माळी दिसत आहे. तसंच ती पवित्र स्नान करताना पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ शेअर करत प्राजक्ताने लिहिलं आहे, ‘तीर्थराज – प्रयागराज २०२५ लहानपणापासूनच कुंभ मेळ्याविषयी मनात कुतूहल होते. १४४ वर्षांनी होणारा हा मेळा याची देही याची डोळा पाहावा, अनुभवावा असं मनात आलं आणि पोहोचले.(काल सुखरूप महाराष्ट्रातही पोहोचले.) आयुष्यात एकदाच येणारा अद्भुत अनुभव आहे.’ अशी भावना प्राजक्ताने व्यक्त केली आहे. दरम्यान प्राजक्ताचा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी तिचं कौतूक केलं आहे. नेटकऱ्यांनी तिच्या व्हिडिओवर कमेंट करत आनंद व्यक्त केला आहे. प्राजक्ता नेहमची सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना आपला अनुभव शेअर करत असते.

https://www.instagram.com/reel/DF118r8ztym/?igsh=b2R4dnc2bDhhb2Jh

‘फुलवंती’नंतर आता लवकरच तिचा नवा चित्रपट प्रेक्षकांच्य भेटीस येणार आहे. ‘चिकी चिकी बुबूम बुम’ असं प्राजक्ता नव्या चित्रपटाचं नाव असून २८ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. अभिनयाबरोबरच प्राजक्ताच्या नृत्याचही खूप कौतूक होतं. शिवाय प्राजक्ता हास्यजत्रा या शोचं सुत्रसंचलन सुद्धा करते.