प्रेम विवाह करताय? मग ही बातमी वाचाच!

Oplus_131072

प्रेम विवाह करणा-यांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, त्या गोष्टी रोखण्यासाठी….

मुंबई – महाराष्ट्रात आजही प्रेम विवाह करणा-यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यांच्या जीवालाही धोका असतो. अशा प्रेम विवाह करणा-या जोडप्यांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. नवविवाहित जोडप्यांच्या सुरक्षेसाठी ‘सेफ हाऊस’ उभारण्याचे आदेश गृह मंत्रालयाने दिले आहेत.

प्रेमविवाह करणाऱ्या जोडप्यांच्या जीवाला असलेल्या धोक्यांवर मात करण्यासाठी गृह मंत्रालयाने सर्व पोलीस आयुक्तालये आणि जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयांना ‘सेफ हाऊस’ उभारण्याचे आदेश जारी केले आहेत. ‘सेफ हाऊस’मध्ये राहण्यासाठी नाममात्र शुल्क आकारले जाईल.नवविवाहित दाम्पत्य येथे एक महिना ते एक वर्ष राहू शकतात. प्रत्येक जिल्ह्यात सेफ हाऊस उभारण्यात येणार आहेत. याठिकाणी सशस्त्र पोलिसांचा २४ तास पहारा असणार आहे. महाराष्ट्रात प्रेमविवाह केल्यामुळे हत्या झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे सरकारवर देखील मोठा दबाव येतो. त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे. अर्थात हा निर्णय कार्यान्वित कधी होणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

सरकारचा हा निर्णय प्रेमविवाह करणाऱ्या जोडप्यांसाठी आधारभूत ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. पण याची नियमावली अटी काय असतील या गोष्टी अनुत्तरित आहेत.