
शाळांना वर्षभरात मिळणार एवढ्या सुट्ट्या, कामकाज असणारे दिवसही घोषित, पहा संपूर्ण यादी

मुंबई – राज्यातील शाळा सुरु होऊन जेमतेम आठवडा झाला आहे. त्यातच आता सरकारकडून वर्षभरातील सुट्ट्याची यादी जाहीर करण्यात आली आहे. या सुट्ट्या शासकीय कार्यालयांना देखील लागू होणार आहेत.

जिल्हा परिषदेची शाळा सकाळी १०.३० वाजता भरणार आहे आणि संध्याकाळी ५ वाजता सुटणार आहे. तर अर्धवेळीची शाळा नऊ ते दुपारी दीड वाजेपर्यंत असणार आहे. शाळेच्या दिवशी ६० मिनिटांची सुट्टी असणार आहे. तर पहिल्या व दुसऱ्या सत्रात १०-१० मिनिटांच्या दोन सुट्ट्या असणार आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांची नियमित वेळ सकाळी १०.३० ते सायंकाळी ५ अशी असणार आहे. राज्यातील सर्व शाळांना एकूण १२८ दिवस सुट्ट्या असणार आहे. यामध्ये सणवार आणि उन्हाळी सुट्ट्यांच्या समावेश आहे. रविवारच्या सुट्ट्यांचादेखील यात समावेश आहे. राज्यातील शालेय कामकाजाचे दिवस २३७ इतके असणार आहेत . यांमध्ये शाळेतील अध्ययन – अध्यापन कृती ( वर्गकार्य ) करीता २१० दिवस असणार आहेत. तर परीक्षा , मुल्यांकन व त्या अनुषंगिक कृती करीता १४ दिवस असणार आहेत . सह – शालेय उपक्रम – यांमध्ये दत्परविना १० दिवस , आनंदायी शनिवार , शैक्षणिक सहल , शिबीर , सण – उत्सव इ करीता १३ दिवस देण्यात आले आहेत.
वर्षभरातील सुट्ट्या
जुलै : आषाढी एकदशी, मोहर्रम, नागपंचमी
ऑगस्ट : रक्षाबंधन, स्वातंत्र्य दिन, गणेश चतुर्थी
सप्टेंबर : गौरी विसर्जन, ईद-ए- मिलाद, अनंत चतुर्दशी, घटस्थापना
ऑक्टोबर : गांधी जयंती आणि दिवाळी
नोव्हेंबर : गुरूनानक जयंती
डिसेंबर : ख्रिसमस- नाताळ
जानेवारी : मकरसंक्रांती, शब्बे- ए- मेराज, प्रजासत्ताक दिन
फेब्रुवारी : शब्बे-ए-बरात, महाशिवरात्री, श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती
मार्च : धुलिवंदन, रंगपंचमी, शब्बे-ए-कदर, गुढी पाडवा, रमजान ईद, रामनवमी, महावीर जयंती
एप्रिल : गुड फ्रायडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
मे : महाराष्ट्र दिन, उन्हाळा सुट्टी









