
चाहत्यांना धक्का, मागील वर्षात ठरली सर्वोत्तम अभिनेत्री, या कारणामुळे घेतला निर्णय?

मुंबई – विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट छावाचा नुकताचे ट्रेलर लाँच करण्यात आला. यात रश्मिका मंदानाचा मराठमोळा लूक चाहत्यांना पहायला मिळाला. याचवेळी रश्मिकाने आपण निवृत्ती घेणार असल्याचे संकेत दिले आहेत.


छावाचा ट्रेलर लाँच झाला त्यावेळी रश्मिका आपल्या दुखऱ्या पायानिशी लाँचिंगच्या कार्यक्रमाला उपस्थित होती. ट्रेलर लाँचवेळी रश्मिका म्हणाली की, ‘दक्षिणेतून येणाऱ्या एका मुलीला महाराणीची भूमिका साकारण्यास मिळणं ही सन्मानाची गोष्ट आहे. या आयुष्यात ही सर्वात खास आणि सौभाग्यशाली गोष्ट आहे. मी आताच लक्ष्मण सरांना म्हणत होते की मला वाटतं की या भूमिकेनंतर मी आता आनंदाने निवृत्ती घेऊ शकते.’ हे ऐकून चाहत्यांना मोठा धक्का बसलाण्याची शक्यता आहे. रश्मिका मंदाना छावा या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नीची म्हणजेच येसूबाई राणी सरकारांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात विकी कौशल हा छत्रपती संभाजी शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात अभिनेता अक्षय खन्ना औरंगजेबची भूमिका साकारत आहे. याशिवाय, आशुतोष राणा, दिव्या दत्ता, नील भूपालम, संतोष जुवेकर आणि प्रदीप रावत हे कलाकार देखील चित्रपटात आहे. 14 फेब्रुवारीला रिलीज होणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून खूपच जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. तर काही ठिकाणी चित्रपटाला विरोध करण्यात येत आहे. दरम्यान चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर त्यावरून वाद सुरू झाला आहे. चित्रपटातील संभाजी आणि येसूबाई नाचताना दाखवणाऱ्या दृश्यावर मराठा गटांनी आक्षेप घेतला आहे.

विकी कौशलने संभाजी महाराजांचे पात्र साकारण्यासाठी १० कोटी रुपये इतकी मोठी फी आकारली आहे. तर रश्मिकाने ४ कोटी रूपये घेतले आहेत. या चित्रपटात रश्मिका येसूबाई भोसले ही भूमिका साकारत आहे. तर ओैरंगजेब साकारत असलेल्या अक्षय खन्नाने २ कोटी रूपये घेतले आहेत.










