राज्यातील पूरपरिस्थितीमुळे लालपरीचा १० टक्के भाडेवाढीचा निर्णय रद्द

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांना निर्देश, सणात एसटीने प्रवास करणाऱ्यांना दिलासा

मुंबई – राज्यातील पूर परिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने केलेली १० टक्के बस भाडे दरवाढ रद्द करण्याचे निर्देश परिवहन मंत्री यांना दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे जाहीर केले आहे.

एसटी महामंडळ दरवर्षी दिवाळीच्या काळात दहा टक्के भाडेवाढ करीत असते. यातून साधारणपणे महामंडळाला ३० कोटी रुपयांचा महसूल मिळतो. मात्र यंदा राज्यात निर्माण झालेली पूरपरिस्थिती लक्षात घेऊन अपवाद म्हणून महामंडळाने जाहीर केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द करण्याबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निर्णय घेण्याचे निर्देश दिल्याचे यावेळी एकनाथ शिंदे यांनी सांगितले. दिवाळीत एसटीच्या तिकिट दरात १० टक्के वाढ करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला होता. मात्र ऐन दिवाळीत एसटीच्या प्रवाशांना भुर्दंड सोसावा लागू नये यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिवहन मंत्र्यांना भाडेवाढ रद्द करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार एसटीची १० टक्के भाडेवाढ रद्द करण्यात आल्याने लाखो प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान दिवाळी सणासाठी एसटी बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. सध्या खासगी वाहने वाढली असली तरीही एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास मानला जातो. अनेक प्रवासी एसटीनेच प्रवास करतात. विशेष म्हणजे दरवर्षी दिवाळी आणि उन्हाळ्यात मे महिन्यात हंगामी भाडेवाढ जाहीर करत असतात.त्यामुळे एसटी महामंडळा मोठा फायदा होत असतो. परंतू गेल्या काही काळात हंगामी भाडेवाढ करुनही एसटी महामंडळाला म्हणावा तसा फायदा मिळालेला नाही.

एसटी महामंडळाने दर वर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी सणासाठी १० टक्के हंगामी भाडेवाढ जाहीर केली होती. या निर्णयानुसार १५ ऑक्टोबरपासून ५ नोव्हेंबर २०२५ पर्यंत या कालावधीत ही भाडेवाढ लागू होणार होती. परंतु, अतिवृष्टी आणि पुरामुळे राज्यातील शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांचे झालेले प्रचंड नुकसान लक्षात घेऊन हंगामी भाडेवाढ रद्द