मॉर्निग वॉक करणार्‍या महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र हिसकाविणारा जेरबंद ; दुचाकीच्या नंबरवरुन चोरटा पोलीसांच्या हाती

मॉर्निंग वॉकला जाणार्‍या महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र मोटरसायकलवरुन आलेल्या चोरट्यांनी हिसकावून नेले होते. गुन्ह्यातील दुचाकीच्या नंबरवरुन पोलिसांनी चोरट्याला पकडले आहे. कृष्णा ऊर्फ किशोर अशोक पवार (वय २६) असे चोरट्याचे नाव आहे.

टिंगरेनगरमध्ये राहणार्‍या महिला २२ सप्टेंबर रोजी मॉर्निंग वॉकला जात होत्या. सनसाईन हॉटेलचे समोरील रोडवर त्यांच्या गळ्यातील मंगळसुत्र चोरट्याने हिसकावून नेले होते.या गुन्ह्याचा तपास करीत असताना तपास पथकातील अंमलदार अमजद शेख, संजय बादरे, संपत भोसले व किशोर भुसारे यांना आरोपींनी वापरलेल्या मोपेडचा नंबर मिळाला. तो आळंदी परिसरात रहात असले तांत्रिक विश्लेषणावरुन समजले.त्यानुसार पोलीस आंळदी परिसरात त्याचा शोध घेत असताना हीच मोपेड घेऊन एक जण जाताना दिसला. पोलिसांनी त्याला पकडून चौकशी केली. त्यात त्याने गुन्ह्याची कबुली दिली. गुन्ह्यामध्ये चोरुन नेलेले मंगळसुत्र ओंकार रमेश चव्हाण याच्याकडे विक्रीसाठी दिले असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी त्याच्याकडून मंगळसुत्र जप्त केले.

या गुन्ह्यातील मंगळसुत्र व वापरलेली मोपेड असा ६६ हजार रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे.ही कामगिरी पोलीस उपायुक्त हिंमत जाधव, सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने, विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव, पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी उपनिरीक्षक नितीन राठोड , पोलीस अंमलदार बबन वणवे, यशंवत किर्वे, कृष्णा माचरे, अमजद शेख, वामन सावंत, संजय बादरे, संपत भोसले, संदीप देवकाते, अक्षय चपटे, किशोर भुसारे यांनी केली आहे.