
राज्य सरकारचा मोठा निर्णय, विधानसभेत मोठी घोषणा, काय आहे कारण जाणून घ्या

मुंबई – मुंबईची लोकल म्हणजे लाखोंची लाईफलाईन. दररोज प्रवासी धक्के खात आणि प्रचंड गर्दीतून प्रवास करतात. अशा स्थितीत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र सरकारने आता सरकारी कर्मचाऱ्यांना अर्धा तास उशिरा कामावर हजर राहण्याची परवानगी दिली आहे.

विधानसभेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत माहिती दिली आहे. सरनाईक यांनी विधानसभेत सांगितले की, ‘कार्यालयातील गर्दी कमी करणे. तसेच मुंबईतील रेल्वे व्यवस्थेवरील ताण कमी करणे. हे या निर्णयामागचे उद्दिष्ट आहे’. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी विधानसभेत मुंबईतील वाढत्या लोकल अपघातांचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. सामान्य लोकलच्या तिकिट दरात एसी लोकलचे तिकीट उपलब्ध करून देत जास्तीत जास्त रेल्वेगाड्या या बंद दरवाज्यांच्या करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशी चर्चा करीत असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठीही अशाच प्रकारच्या वेळेच्या नियोजनाचा विचार करण्यासाठी टास्क फोर्स स्थापन केली जाईल, असंही सरनाईक म्हणाले आहेत. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी लोकल अपघातांचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर ही घोषणा झाली. कामाचे एकूण तास तेवढेच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलंय. प्रताप सरनाईक यांनी सांगितलं की, हा किरकोळ बदल असला तरी लाखो प्रवाशांना दिलासा मिळेल. तसेच, मेट्रोसारख्या पर्यायी वाहतूक पद्धती वापरण्यास प्रोत्साहन देण्यासाठीही सरकार प्रयत्नशील आहे. त्यामुळे अनेक वेळा अपघातही होतात. अशा परिस्थितीत, मुंबई लोकलमधील गर्दी कमी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने गुरुवारी कर्मचाऱ्यांना नेहमीपेक्षा अर्धा तास उशिरा कामावर येण्याचा पर्याय देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या या पावलाचा उद्देश गर्दीच्या वेळी मुंबई लोकसमधील गर्दी कमी करणे आणि खचाखच भरलेल्या डब्यांमध्ये अडचणीत असलेल्या हजारो प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा देणे आहे.
मुंबईतील लोकल रेल्वे ही शहराची जीवनवाहिनी मानली जाते. दररोज लाखो प्रवासी या लोकल ट्रेनने प्रवास करत असतात. मात्र दिवसेंदिवस वाढणारी गर्दी, अपघातांची वाढती संख्या आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न या सर्व गोष्टींना अनुसरून हा निर्णय घेण्यात आला आहे. पण यावर समिश्र प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.









