
(प्रतिनिधी – प्रियंका बनसोडे) – दोघे जण भांडणे करत असताना ती मिटविण्यासाठी जाणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले. त्याला दगडाने बेदम मारहाण केली गेली. त्यात त्याच्या डोळ्याच्या वरच्या बाजूला जखम झाली असून त्यावर ४ टाके घालण्याची वेळ आली.

याबाबत अमोल राम गायकवाड (वय २७) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गणेश येलगुंडे याच्यावर गुन्हा दखल केला आहे.ही घटना तीन हत्ती चौकातील गिरे फरसाण समोर सोमवारी मध्यरात्री साडेबारा वाजता घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा मित्र शुभम रावडे यास घरी सोडण्यासाठी गेला होता. त्यावेळी तेथे सागर येनपुरे, गणेश येलगुंडे, प्रसाद मोरे हे गप्पा मारत उभे होते. तेथे गेल्यावर शुभम व त्यांचे वाद सुरु झाले. ते एकमेकांना शिव्या देऊ लागले. त्यांचा वाद मिटविण्यासाठी फिर्यादी मध्ये गेले असताना अचानक गणेश येलगुंडे फिर्यादीजवळ आला व सागरला टारगेट का करता असे विचारुन फिर्यादीचा गळा धरला. तेव्हा झटापटीत दोघे खाली पडले. गणेश लगेच उठवला व तेथे पडलेला दगड उचलून त्याने फिर्यादीला मारला.तो दगड फिर्यादीच्या डाव्या डोळ्याच्या वरच्या बाजूला लागून खोच पडली. त्यावर ४ टाके घालावे लागले. पोलीस हवालदार ढमाळ तपास करीत आहेत.









